शिवाजी पार्कवर मनसेचा गुडीपाडवा मेळावा, काय बोलणार राज ठाकरे? याकडे सर्वांचे लक्ष
X
गुडीपावडव्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुडीपाडवा मेळावा आज मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. गुडीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या या मेळाव्यात राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका घेणार हे ऐकण्यासाठी जनतेच्या मनामध्ये प्रचंड मोठी उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांत मनसे आणि भाजप युतीसंदर्भातील चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले असून आज होणाऱ्या या मेळाव्यात राज ठाकरे भाजप-मनसे युतीची घोषणा करतील का? याकडे सुध्दा सर्वांचे लक्ष लागलं आहे.
आता बोलण्याची वेळ आली आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसेने गुडीपाडव्याचा एक टीझर लाँच केला होता आता सांगण्याची वेळ आली आहे, असं राज ठाकरेंनी या टीझरमध्ये म्हटलं होतं. गेल्या काही दिवसांपासून आपल्या पक्षाबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत, याकडे मी शांतपणे बघत होतो. पण आता या सगळ्यावर बोलण्याची वेळ आली आहे. नक्की काय घडतंय, काय घडवलं जातय..? हे सांगण्याची आता वेळ आली आहे, अशी भूमिका राज ठाकरे त्या टीझरमध्ये म्हटलं होतं.
चला शिवतीर्थावर ! #मनसे_पाडवामेळावा #MNSGudhiPadwaRally pic.twitter.com/3p5qi70TyV
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 6, 2024