राम कदम डोक्यावर पडले
एका मराठी व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अर्णब साठी भाजपने हास्यास्पद आंदोलन हाती घेतलं आहे.
X
अर्णब गोस्वामी ला जामीन मिळत नाही म्हणून व्यथित झालेल्या भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी ' मन्नत' मागीतली असून आपली मन्नत पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी सिद्धीविनायक मंदिरापर्यंत पायी यात्रा काढली आहे. रिपब्लिक टीव्ही चा मालक अर्णब गोस्वामी हा सातत्याने पत्रकारितेवर हल्ले करत आला आहे, एका वैयक्तिक व्यवहारामध्ये त्याने इंटिरीअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईची फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अर्णबला अटक झालीय. अर्णबच्या अटकेनंतर भाजपाच्या गोटात मातमचा माहौल असून अर्णबच्या सुटकेसाठी आता भाजपच्या नेत्यांनी जामीन मिळेपर्यंत काळ्या फिती लावणे, मंदिराच्या पायी यात्रा करणे असे उपक्रम सुरू केले आहेत.
दरम्यान, अर्णबला जामीन मिळावा म्हणून अर्णब गोस्वामी ने वकिलांची फौज उभी केली असून सत्र न्यायालय, उच्च न्यायालय अशा विविध न्यायालयांमध्ये तो आपली बाजू मांडत आहे. मात्र न्यायालयांनी अर्णब गोस्वामी याला तातडीने दिलासा दिलेला नाही. न्यायालयाची प्रक्रीया पाळूनच निर्णय दिला जाईल अशी न्यायलयांची भूमिका असल्याने अर्णबची तळमळ वाढली आहे, आणि त्याचमुळे भाजपही अस्वस्थ झाला आहे. याच अस्वस्थतेपोटी एका मराठी व्यावसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अर्णब साठी भाजपने हास्यास्पद आंदोलन हाती घेतलं आहे.