मिथून चक्रवर्ती अखेर भाजपमधे.....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोलकातामधील ब्रिगेड मैदानातून बंगालमधील जनतेला संबोधित केलं. पंतप्रधान सभास्थळी पोहचण्यापूर्वी एक तास अगोदरच मिथुन चक्रवर्ती मंचावर दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
X
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मागील महिन्यात मिथून चक्रवर्ती यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. या भेटीनंतर मिथून चक्रवर्ती भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, ही भेट कौटुंबिक असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं होतं. मात्र, बंगालच्या राजकीय वर्तुळात मिथून चक्रवर्ती भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरूच होत्या. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची आज कोलकाता प्रचारसभेत प्रकट झाले.
काल मिथून चक्रवर्ती यांनी बंगाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीची माहिती विजयवर्गीय यांनी ट्विट करून दिली, होती व्यास सीपठावर येत मिथून चक्रवर्ती यांनी भाजपमधे प्रवेश केला.
२०११ मध्ये मिथुन यांनी ममता बॅनर्जी यांच्या विनंतीवरून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तृणमूलने त्यांना राज्यसभेवर पाठवल होतं. मात्र, २०१६ मध्ये मिथुन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राजकीय सन्यास घेतला होता. मात्र, भागवत यांच्या भेटीनंतर मिथुन चक्रवर्ती भाजपात प्रवेश करुन पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवणार असल्याच्या चर्चा सुरू झाली होती. आज पुन्हा एकदा मिथून यांनी बंगालच्या राजकारणात पाऊल ठेवलं आहे.