"बिडीची जेवढी किंमत आहे तेवढी किंमत पण ईडी ची महाराष्ट्रात राहिली नाही" - धनंजय मुंडे
X
नांदेड जिल्ह्यामध्ये विधान सभा पोटनिवडणुकीचे पडघम वाजत आहेत. या निवडणुकीमध्ये काँग्रेसतर्फे जितेश अंतापुरकर यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यांच्या प्रचारसभेत धनंजय मुंडे यांनी भाजपवर टीका करताना "शेतात जेवढी मजूर बिडीची किंमत आहे तेवढी पण ED ची किंमत महाराष्ट्रात राहिली नाही", ED वर टीका केली.
यावेळी बोलताना, "होत्याच नव्हतं, आणि नव्हत्याच होतं असं सगळं शरद पवार साहबांनी केलं. 64 चे मुख्यमंत्री झाले, 56 चे उपमुख्यमंत्री झाले, 44 चे मंत्री झाले आणि 105 वाला विरोधीपक्ष नेता झाला अशी किमया या महाराष्ट्रात झाली. महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी राज्यातील सत्ताधारी लोकांच्या मागे CBI, ED, IT लावलं. तेही कमी कि काय म्हणुन NCB आणलं.
लखिमपुर शेतकरी हत्या प्रकरण, अदानी, मुंद्रा पोर्टवर सापडलेले हजारो- कोटी रूपयांचे गांजा, कोकिन लपवण्यासाठी केंद्र सरकार हा खटाटोप करत आहे. CBI, I.T. आणि ED यांची तर चव या सरकारने इतकी घालवली की शेतकऱ्याच्या शेतात मजूराच्या बिडीची जेवढी किंमत असते तेवढीही किंमत त्यांना राहिली नाही." अशी टीका राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना केली.