Home > Max Political > मंत्री अतुल सावेंच विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांना प्रत्युत्तरMinister Atul Savench's reply to Leader of Opposition Vadettivar

मंत्री अतुल सावेंच विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांना प्रत्युत्तरMinister Atul Savench's reply to Leader of Opposition Vadettivar

मंत्री अतुल सावेंच विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांना प्रत्युत्तरMinister Atul Savenchs reply to Leader of Opposition Vadettivar
X

मागील दोन तीन दिवसापासून राज्यात कोसळणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः रडवलं आहे. अवकाळी पावसामुळे सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पाहणी दौरा केला दरम्यान यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली असता जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतूल सावे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे, निकष बाजूला काढून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी. सर्व योजनेला ब्रेक लावून, शेतकऱ्यानं सरसकट कर्ज माफ करा असं वक्तव्य केलं आहे तर सरकारचे लक्ष तिजोरी साफ करण्याकडे आहे. तोंड पाहून दुष्काळ घोषित करायचे महाराष्ट्रात सुरू आहे. असा टोमणा देखील विजय वडे्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला

मंत्री अतुल सावे यांच प्रत्युत्तर

दरम्यान यावर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी वडेट्टीवार यांना प्रत्युत्तर देत म्हटले की विरोधी पक्ष नेत्यांचं बोलण्याचं हे कामच असतं ते पण अडीच वर्ष सत्तेत होते त्यांनी सत्तेत काय केलंय त्यांना हा प्रश्न विचारा मुख्यमंत्र्यांनी कालच बैठक घेत ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. त्या सर्व पालकमंत्र्यांनी झालेल्या पिकांच्या पंचनामे करून घेऊन लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी दिल्याचं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलंय

Updated : 30 Nov 2023 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top