Home > Max Political > शेतकरी आंदोलन करणारे मवाली, मोदी सरकारच्या मंत्री मिनाक्षी लेखी यांचं संतापजनक वक्तव्य

शेतकरी आंदोलन करणारे मवाली, मोदी सरकारच्या मंत्री मिनाक्षी लेखी यांचं संतापजनक वक्तव्य

शेतकरी आंदोलन करणारे मवाली, मोदी सरकारच्या मंत्री मिनाक्षी लेखी यांचं संतापजनक वक्तव्य
X

केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांच्या वादग्रस्त विधानाने आता राजकारण तापलं आहे. कॉंग्रेस मीनाक्षी लेखी यांच्या वक्तव्यावरुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मिनाक्षी लेखी यांनी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना मवाल्यांशी केली आहे. तसंच त्यांनी अशा प्रकारे आंदोलन करणं अपराध असल्याचं म्हटलं आहे. गेल्या 8 महिन्यांपासून शेतकरी दिल्ली येथे मोदी सरकारने केलेले 3 कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे.

पेगासस प्रकरणावरून संसदेत गोंधळ झाला. त्यानंतर मंत्री मीनाक्षी लेखी यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेतली.

त्यानंतर पत्रकारांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात मिनाक्षी लेखी यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी...

सर्वात अगोदर त्यांना शेतकरी म्हणणं बंद करा, कारण ते शेतकरी नाही. ते षड्यंत्री लोकांच्या हातावर चढलेले काही लोक आहेत. सतत शेतकऱ्यांच्या नावावर काही ना काही करत असतात. शेतकऱ्यांजवळ जंतर मंतर वर येऊन बसायला वेळ नाही. ते आपल्या शेतात काम करत आहेत. हे आडत्याची माणसं आहेत. त्यांना शेतकऱ्यांना फायदा व्हावा असं वाटत नाही. अशा प्रकारे आंदोलन करणं गुन्हा आहे. विरोधी पक्ष अशा गोष्टींना हवा देत आहे.

त्यानंतर दुसऱ्या एका प्रश्नात पत्रकारांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं नाव घेतल्यानंतर मिनाक्षी लेखी यांनी तुम्ही पुन्हा एकदा त्यांना शेतकरी म्हटलं ते शेतकरी नाही. ते मवाली आहेत.

दरम्यान मिनाक्षी लेखी यांच्या या वक्तव्यावरुन राजकारण तापलं असून कॉंग्रेसने मिनाक्षी लेखी यांचा राजीनामा मागितला आहे.

Updated : 22 July 2021 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top