MaxMaharashtra Impact: दिव्यांगांच्या ST सवलतीमुळे एसटी तोट्यात, वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली दिलगीरी
MaxMaharashtra Impact: दिव्यांगांच्या ST सवलतीमुळे एसटी तोट्यात, वादग्रस्त विधान करणाऱ्या आमदार राजेंद्र राऊत यांनी व्यक्त केली दिलगीरी
X
संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. एसटी कर्मचारी महामंडळाचं विलिनीकरण करण्यासाठी आयोग निर्माण करा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जो पगार आहे. तोच एसटी कर्मचाऱ्यांना लागू करा. अशा मागण्या करत आहे.
मात्र, सरकारने यासाठी तीन आठवड्याचा कालावधी मागितला आहे. आजपर्यंत 37 आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळं सरकारने तात्काळ यावर निर्णय घेण्याची मागणी केली जात असताना या संपाला पाठींबा देण्यासाठी अनेक सामाजिक संघटनांसह राजकीय पक्ष पुढे आले आहेत.
मात्र, बार्शी मतदारसंघाचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या एका विधानाने खळबळ उडाली होती. अपंगांसाठी असलेल्या फुकट च्या योजना दुर्दैवी आहेत व याचमुळे महामंडळ तोट्यात आले आहे. फुकटच्या सवलती देणे ही दुर्दैवी घटना आहे. कोट्यवधी रुपये बँकेत असलेला अपंग एसटीने प्रवास करतो. अन् स्वतःसोबत अजून एक फुकट नेतो. कसे महामंडळ तोट्यात येणार नाही.
असं वादग्रस्त विधान राजेंद्र राऊत यांनी केले होतं. या संदर्भात मॅक्समहाराष्ट्रने वृत्त दिलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी राऊत यांना या संदर्भात विचारणा देखील केली होती. अखेर Max Maharashtra च्या बातमीनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे.
"अपंग बांधवांच्या भावना दुखावणे हा माझा उद्देश नव्हता उदाहरण देत असताना अपंग हा उल्लेख माझ्याकडून झाला आहे आणि त्यामुळे जर अपंग बांधवांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो." असे स्पष्टीकरण आमदार राऊत यांनी दिलं आहे.