मराठा - ओबीसी, आमने - सामने......
X
मुंबई - येत्या २६ तारखेपासून मुंबईमध्ये ओबीसींचे मोठे आंदोलन होणार असून लाखोंच्या संख्येने आंदोलन करते मुंबईत दाखल होणार आहेत. या आंदोलनासाठी गाढव- डुकर देखील आंदोलनात असणार आहे. हे आंदोलन सरकारला परवडणार नाही. असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे.
ओबीसी समाजाचे 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू होणार आहे. तत्पूर्वी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये अमरण उपोषण करणार आहेत. यावेळी आंदोलनासाठी लाखो मराठा आंदोलक हे मुंबईमध्ये वीस तारखेला दाखल होणार आहेत. 26 तारखेला ओबीसींचा देखील मुंबईमध्ये मोठं आंदोलन सुरू होणार आहे. ओबीसींचे देखील लाखोंच्या संख्येने आंदोलन करते मुंबईमध्ये दाखल होणार आहे. या वेळी मराठा आणि ओबीसी समाज आमने-सामने येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आरक्षणाच्या विषयाला घेऊन सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं असून मराठा आरक्षणासंदर्भात आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात लाखोंच्या संख्येने दोन्ही समाजाचे आंदोलन करते हे मुंबईत दाखल होणार आहेत. यावेळी हे आंदोलन करते एकमेकांच्या आमने-सामने येथील का आणि या आंदोलनाला काय नेमके वळण लागेल. हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.