Home > Max Political > कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेते जोमात, कार्यकर्ते कोमात...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेते जोमात, कार्यकर्ते कोमात...

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप नेते जोमात, कार्यकर्ते कोमात...
X

कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपच्या भूमिकेनं कार्यकर्त्यांची अवस्था सहनही होईना आणि सांगताही येईना अशी झाली आहे का? वाचा ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची परिस्थीती

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडल्यानंतर जो गोंधळ निर्माण झाला होता. त्यापेक्षा अधिक गोंधळ आता निर्माण झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेची युती तुटली. त्यामुळे इतके वर्ष सोबत असलेले भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कोणता पक्ष कोणासोबत युती, आघाडी करेल. हे सांगता येत नाही. त्यामुळं ग्रामीण भागातील कार्यकर्ते पेचात पडले आहेत.

दररोज आपल्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन सोशल मीडियावर हमरीतुमरी करणाऱ्या कार्यकर्त्यांची आता चांगलीच गोची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेला कॉंग्रेस स्वबळाची भाषा करत आहे. तर इकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी स्वाभीमानाशी तडजोड करत दुसऱ्यांच्या पालख्या उचलणार नाही, भले ही फाटक्या चपला पायात असल्या तरी चालतील. असं म्हणत अधिकच संभ्रम वाढवला.

तर दुसरीकडे प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावं असं पत्र उद्धव ठाकरेंना पाठवलं आहे. पत्रामुळे भाजप शिवसेना एकत्र येतील का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तर कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांची पहिल्यापासून जवळीक असली तरी राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाऊ शकते. असा अजित पवार यांचा अनुभव गाठीशी असताना कॉग्रेस कार्यकर्ते गोंधळात आहेत. तर इकडे दररोज शरद पवारांवर What's App शरद पवारांनी काय केलं? असा प्रश्न विचारणारे भाजप कार्यकर्ते सध्या काय बोलावं या पेचात आहेत. हे झालं ग्रामीण राजकारण...

जिल्हा स्तरावर तर मोठाच विषय झाला आहे. आगामी महापालिका निवडणूकांच्या तोंडावर जिल्हा लेव्हलच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नक्की कोण जवळचा आणि कोण लांबचा? हेच समजत नसल्यानं नियोजन करता येत नाही. कोरोनामुळे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार आणि कोल्हापूर या ठिकाणच्या महापालिकेच्या आणि ६५ नगरपालिकांच्या आणि नगरपरिषदांच्या निवडणूका प्रलंबित आहेत. भरीस भर म्हणजे मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या सह दहा महानगरपालिकांच्या निवडणूका येत्या फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. त्यामुळे या महानगरातील कार्यकर्ते नियोजनाला लागले आहे. मात्र, नियोजनात कोण आपला आणि कोण परका याचं गणित बांधणं या कार्यकर्त्यांना कठीण जात आहे.

या वर्षी साधारणपणे औरंगाबाद, नवी मुंबई, वसई विरार, कोल्हापूर, या महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. तर 2022 ला मुंबई, अमरावती, सोलापूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, अकोला, नागपूर, उल्हासनगर या महापालिकांच्या निवडणूका होत आहेत. त्यामुळं या निवडणुकांमध्ये कोणाला आपला सखा म्हणावा, हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

Updated : 22 Jun 2021 1:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top