महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी मोठी घोषणा
राज्यातील सामान्य नागरिकांसाठी असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
X
राज्यातील सामान्य नागरिकांसाठी असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या मर्यादेत मोठी वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य क्षेत्रासाठी मोठी घोषणा केली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची मर्यादा वाढवली आहे. यात या योजनेची मर्यादा दीड लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ राज्यातील नागरिकांना मिळावा यासाठी नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करण्यात आला आहे. तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत नेण्यात आले आहे. याबरोबरच राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.