Home > Max Political > 5 State Election announcement : पाच राज्यांच्या निवडणूक तारखा जाहीर, भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

5 State Election announcement : पाच राज्यांच्या निवडणूक तारखा जाहीर, भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

देशात एक देश एक निवडणूकांचं वारं वाहत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणूकांचे वेळापत्रक जारी केलं आहे.

5 State Election announcement : पाच राज्यांच्या निवडणूक तारखा जाहीर, भाजप-काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला
X

गेल्या काही दिवसांपासून पाच राज्यातील निवडणूकांसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत पाच राज्यांच्या निवडणूकांची घोषणा केली. यामध्ये राजीव कुमार यांनी म्हटले की, दोन टप्प्यात पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामध्ये मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्याबरोबरच छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबर तर तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होऊन 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली.

पाच राज्यांच्या निवडणूका या लोकसभेच्या सेमी फायनल निवडणूका मानल्या जातात. त्यामुळे या पाच राज्यातील निवडणूकांवरून लोकसभेसाठी लोकमत तयार होतं. त्यामुळे या पाच राज्यात सत्ता राखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मध्य प्रदेशमध्ये 2018 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं होतं. पण त्यानंतर ऑपरेशन लोटसच्या माधम्यमातून ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि शिवराज सिंह चव्हाण मुख्यमंत्री बनले. तर राजस्थानमध्ये भाजपची सत्ता जाऊन अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री बनले. तेलंगणात भारत राष्ट्र समितीचे के सी राव हे मुख्यमंत्री आहेत. तर छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे रमण सिंह हे मुख्यमंत्री आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटचे झोरामथंगा हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पाच राज्यापैकी राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आहे. तर तेलंगणा आणि मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. त्यामुळे राज्यसभेतील घटलेलं मतदान वाढविण्यासाठी आणि 2024 च्या लोकसभा निवडणूकीची रंगीत तालीम असल्याने भाजपसाठी या निवडणूका प्रतिष्ठेच्या आहेत. तर आपलं वर्चस्व सिध्द करण्यासाठी इंडिया आघाडी मैदानात उतरली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे.


Updated : 9 Oct 2023 3:08 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top