मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी
वर्धा येथे ९६ व्या मराठी साहित्य संमेलन भरले होते ,या साहित्य संमेलनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर विदर्भवाद्यांची स्वतंत्र विदर्भाच्या राज्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे नारेबाजीने संमेलनाचा नूर पालटला.
X
मराठी भाषेसाठी साहित्यकांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.राज्यकरण्यासाठी सभा व गर्दी यांच काही विशेष महत्त्व नसते.मात्र इथे जमलेली गर्दी ही साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. पंढरीत वारी करतात . तसेच साहित्यावर प्रेम करणारे रसिक आज या ठिकाणी येत असतात. अस वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.यावेळी कवी कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कौतुक केले.
आज मला येथे साहित्याची पंढरी दिसते .
आज येथे साहित्य नगरी सजली आहे. त्यामळे साहित्याची पंढरी या ठिकाणाला म्हटल तरी आज वावग ठरणार नाही.खर तर या साहित्य संमेलनात राजकारण्यांचं काय काम ? त्यामुळे मी या कार्यक्रमात एक साहित्य रसिक म्हणून आलो आहे. येथे तीन दिवस साहित्य संमेलन होणार आहे . या संमेलनात साहित्याचा जागर होणार आहे. आम्ही पाहुणे म्हणुन आलो आहोत .या कार्यक्रमात कुठेही राजकीय हस्तक्षेप असणार नाही ,अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
कार्यक्रम दरम्यान विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी ......
वर्धा येथे ९६ व्या मराठी साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे लक्ष देण्यासाठी विदर्भवाद्यांची जोरदार घोषणाबाजी केली आहे. विदर्भवादी 50 कार्यकर्ते श्रोते म्हणुन साहित्य संमेलनात आले .आक्रमक कार्यकत्यांनी सर्व भाषणे होऊ दिली व ऐन संमेलनाध्यक्षांच्या भाषणावेळी स्वतंत्र विदर्भाच्या राज्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणा होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते .त्यामुळे नारेबाजीने संमेलनाचा नूर पालटला. यात महिलचा सहभाग लक्षणीय होता. स्वतंत्र विदर्भ न देणाऱ्या राजकीय नेत्यांचा निषेधाचा ठराव, स्वतंत्र विदर्भाचा ठराव मांडण्याचा मागणी करण्यात आली . पोलीसांनी अखेर हस्तक्षेप करीत सर्व आक्रमक कार्यकर्तेना ताब्यात घेतले आहे.
भूमिला मी वंदन करतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.
ब्रिटिशांना चले जाव असं ठणकावलं सांगितले आणि देशवासीयांना खेड्याकडे चला असा मंत्र दिला ,अशा महात्मा गांधींचं वास्तव्य झालेल्या या भूमिला मी वंदन करतो आहे.मला साहित्यसंमेलनाच उद्घाटन करण्याचा बहुमान मला मिळेल असा कधी वाटल नव्हत .मी साहित्य संमेलनात आलेल्या सर्वाचे स्वागत करतो.मी आज एका कृतज्ञ भावननेने इथे उभा आहे, अस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.