Home > Max Political > मराठवाड्याची तहान भागवण्याच 'पुण्य' ठाकरे सरकारच्या नशिबात नाही: लोणीकर

मराठवाड्याची तहान भागवण्याच 'पुण्य' ठाकरे सरकारच्या नशिबात नाही: लोणीकर

मराठवाड्याची तहान भागवण्याच पुण्य ठाकरे सरकारच्या नशिबात नाही: लोणीकर
X

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या मराठवाडा ग्रीड प्रकल्पच्या कामाला ठाकरे सरकारने ग्रीन सिग्नल दिली आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली. मात्र तुकड्या-तुकड्याने होणारे काम आम्हाला मान्य नसून, यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिला आहे.

मॅक्स महाराष्ट्रासोबत बोलताना लोणीकर म्हणाले की, ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय म्हणजे, लबाडाच्या घरचं जेवण अशी गत झाली आहे. अर्थमंत्री म्हणाले होती की, दोनशे कोटींची तरतूद केली, पण प्रत्यक्षात एक इट सुद्धा त्यांच्याकडून लावली गेली नाही. त्यामुळे बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात,अशी परिस्थिती या सरकारची असल्याचं लोणीकर म्हणाले.

पाहू मॅक्स महाराष्ट्राला दिलेल्या मुलाखतीत लोणीकर काय म्हणाले....

Updated : 24 Jun 2021 10:24 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top