ठाकरे गटाकडून आणखी ४ उमेदवारांची यादी जाहीर...! पहा कोण आहेत हे उमेदवार
X
राज्यात लोकसभेच्या निवडणूकीसाठी रणधुमाळी सुरू झाली आहे, अशातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आणखी चार उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर कल्याण मधून वैशाली दरेकर, हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील आणि पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामाडी या सर्वसामान्या शिवसैनिक असलेल्या महिलेल्या लोकसभा निवडणूकीच्या रणांगणात उतरविण्यात आले आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना कल्याण, जळगाव, हातकणंगले व पालघर या 4 लोकसभा मतदार संघांतील आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातून वैशाली दरेकर या कार्यकर्तीला संधी दिली आहे. कल्याण हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे आता शिंदे यांना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा सामना करावा लागेल, असं ठाकरे म्हणाले.
जळगावातून करण पवारांना संधी :
जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे समर्थक असलेल्या करण पवार यांना जळगाव लोकसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांची स्थानिक राजकारणावर चांगली पकड आहे. आणि विशेष बाब म्हणजे उन्मेश पाटील यांच्याबरोबर मातोश्रीवर जाऊन उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण पवार यांनी सुध्दा ठाकरे गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उन्मेश पाटील यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात ताकद मिळणार आहे. जळगावमधून करण पवार यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्याशी त्यांचा सामना रंगणार आहे.
यासह पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामाडी, तर हातकणंगलेतून सत्यजित आबा पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
प्रकाश आंबडकरांबर बोलणे टाळले :
यावेळी प्रकाश आंबडकरांद्दल बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांविषयी मी काहीही बोलणार नाही. माझ्या आणि त्यांच्या आजोबांचे एकमेकांशी चांगले ऋणानुबंध होते. आम्ही हुकूमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र आलो होतो. त्यामुळे आज आपले जमले नसले तरी ते भविष्यात जमणारच नाही अशी भूमिका घेऊ नये. काहीवेळा काही गोष्टी जुळत नाहीत. संजय राऊतांनर त्यांनी केलेल्या आरोपांत काही तथ्य नाही. त्यांच्याविरोधात आमच्याकडून कुणी काहीही बोलले नाही आणि बोलणारही नाही अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली.