सीमावादावर एकत्र येऊन तोडगा काढू; भारत-चीन दरम्यान सकारात्मक चर्चा
X
सध्या LAC (line of actural control) सीमेवर भारतासोबतची परिस्थिती सामान्य असल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग म्हणाले की, कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची २१ वी फेरी दोन्हीही देशांमध्ये १९ फेब्रुवारी रोजी झाली. यादरम्यान भारत आणि चीनमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
दोन्ही देशांनी एलएसीबाबत एकमेकांच्या चिंता लक्षात घेऊन तोडगा काढण्याचे मान्य केले आहे, असं चीन म्हणाला. खरंतर, भारताने म्हटले होते की, चुशूल-मोल्डो सीमा केंद्रावर कॉर्प्स कमांडर-स्तरीय बैठकीच्या २१ व्या फेरीत डेपसांग आणि डेमचोकच्या ट्रॅकच्या जंक्शनवरून सैन्य मागे घेण्याची भारताची मागणी चीनने फेटाळली.
यावर चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की, हे खोटे आहे. चीनसाठी दोन्ही देशांमधील लष्करी संबंध अत्यंत महत्वाचे आहेत. आम्हाला आशा आहे की भारत आणि चीन मतभेद दूर करण्यासाठी आणि परस्पर विश्वास वाढविण्यासाठी एकत्र काम करत राहतील.