Home > Max Political > अखेर ड्रगनची गोगरा सेक्टर मधून 12 व्या फेरीनंतर माघार

अखेर ड्रगनची गोगरा सेक्टर मधून 12 व्या फेरीनंतर माघार

अखेर ड्रगनची गोगरा सेक्टर मधून 12 व्या फेरीनंतर माघार
X

भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर्सच्या 12 व्या फेरीच्या चर्चेनंतर दोन्ही देशांच्या सैनिकांनी पूर्व लडाख भागातील गोगरा सेक्टर येथून माघार घेतली आहे. तसेच या भागात बांधण्यात आलेली तात्पुरती बांधकामे पाडण्यात आल्याचे सरकारने म्हटलं आहे. भारताने 4 आणि 5 ऑगस्ट ला गोगरा पोस्ट अर्थात PP17A वरून सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

गेल्या वर्षी लडाखमध्ये झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झाली होती आणि दोन्ही देशांचे सैन्य आसपासच्या भागात तैनात करण्यात आले होते. याच समस्यांचे निराकरण करण्यासाठी, दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर्समध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीला दिलेल्या अहवालानुसार, भारत आणि चीनच्या कोर कमांडर्स मध्ये झालेल्या 12 व्या फेरी 31 जुलै 2021 ला पूर्व लडाखमधील चुशूल मोल्दो या ठिकाणी पार पडली.

या संदर्भात एक निवेदन जारी करण्यात आलं आहे....

भारत-चीन सीमा भागातील पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील डिसइंगेजमेंट आणि उर्वरित क्षेत्रांचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे बातचीत झाली आहे.

भेटीनंतर दोन्ही पक्ष गोगरा परिसर मोकळा करण्यावर एकमत झाले. गेल्या वर्षी मे महिन्यापासून या भागातील सैनिक समोरासमोर होते.

त्याचबरोबर, दोन्ही बाजूंनी परिसरात बांधलेली सर्व तात्पुरती बांधकामे पाडण्यात आली असून तणावा अगोदरची परिस्थिती दोन्ही बाजूंनी पूर्ववत करण्यात आली आहे.

दोन्ही बाजूंनी या नियमांचं काटेकोरपणे पालन आणि आदर करतील. त्याचबरोबर यामध्ये कोणताही एकतर्फी बदल होणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीलाच सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार लडाखमध्ये सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी भारत आणि चीन यांच्यातील 12 व्या फेरीतील कोर कमांडर स्तरावरील चर्चेमध्ये, एका प्रमुख ठिकाणावरून सैन्य मागे घेण्यावर सहमती झाली होती.

मात्र इतर अनेक भागांमध्ये अजूनही गतिरोध सुरू आहे. सरकारी सूत्रांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार भारत आणि चीनने पूर्व लद्दाखमधील मुख्य गस्त पॉइंटवरून तत्त्वतः सहमती दर्शविली आहे. आणि जवळपास सहा महिन्यांपासून सुरू असलेला सीमा चर्चेतील अडथळा संपला आहे.

रिपोर्टनुसार, कोर कमांडरच्या शनिवारी झालेल्या बाराव्या फेरी दरम्यान PP17A वर करार झाला. ही बैठक लडाखमधील 15 महिन्यांची अडचण सोडवण्याच्या उपाययोजनांचा एक भाग होती.

सोमवारी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात, भारत आणि चीनच्या सैन्याने पूर्व लडाखमधील प्रलंबित समस्या लवकर सोडवण्यावर सहमती दर्शविली आहे आणि लष्करी स्तरावरील चर्चेच्या 12 व्या फेरीला रचनात्मक करार दिला आहे.

Updated : 6 Aug 2021 9:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top