राष्ट्रपतींनी किरण बेदींना उपराज्यपाल पदावरुन हटवलं...
राष्ट्रपतींनी किरण बेदींना अचानक पॉन्डेचेरीच्या उपराज्यपाल पदावरुन हटवलं, काय आहे कारण वाचा
X
पॉन्डेचेरी मध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री नारायणसामी सरकार राजकीय संकटात सापडल्याची चर्चा सुरु असताना मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पॉन्डेचरीच्या राज्यपाल किरण बेदी यांना पदावरुन हटवलं आहे. त्या साडेचार वर्षापेक्षा अधिक काळ या पदावर होत्या.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निर्देशात किरण बेदी यांना आपला पदभार तेलंगाना च्या राज्यपाल डॉ. तामिलिसाई सौंदर्यराजन यांना सोपवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडे आता तेलंगना बरोबरच पॉन्डेचेरी चा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे.
पॉन्डेचेरी विधानसभा संख्याबळ
३३ सदस्य संख्या असलेल्या पॉन्डेचरीच्या विधानसभेत विरोधी पक्षाचं संख्याबळ १४ वर पोहोचलं आहे. त्यामुळं विरोधीपक्षांनी नारायणसामी सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला आहे. तर नारायणसामी यांनी आपलं सरकार अल्पमतात नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, नारायणसामी यांच्या पक्षाच्या एका आमदाराने नुकताच राजीनामा दिला आहे. त्यामुळं पॉन्डेचरी सरकार अल्पमतात आल्याची चर्चा आहे.