Home > Max Political > वादग्रस्त वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांना सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावलं

वादग्रस्त वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांना सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावलं

वादग्रस्त वक्तव्यावरुन जितेंद्र आव्हाडांना सुशीलकुमार शिंदे यांनी सुनावलं
X

Nagpur : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. न्यायपालिकेच्या काही निर्णयात जातीयतेचा वास येतो. न्यायव्यवस्थेत आरक्षण न देऊन बाबासाहेबांनी 80 टक्के समाजावर अन्याय केला, असं वक्तव्य आव्हाड यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता जोरदार टीका होतं आहे. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ सुशीलकुमार शिंदे म्हटले आहेत की, "ज्युडिशिअरीमध्ये आरक्षण न देण्याचं धोरण बाबासाहेबांची पूर्ण चिंतन करून आखलं आहे. त्यावर भाष्य करणं अयोग्य आहे असं म्हणत शिंदे यांनी आव्हाडांना सुनावलं आहे, तर आव्हाड बाबासाहेबांपेक्षा मोठे विचारवंत झाले का ? असा सवाल भाजप नेते आशिष देशमुख यांनी केलाय. जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून आंबेडकरी जनतेला दुखावण्याचे काम केलंय अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड नैराश्याने ग्रासले असून चर्चेत राहण्यासाठी ते केविलवाणा प्रयत्न करत आहेत असंही ते म्हणालेत.

जितेंद्र आव्हाडांच वक्तव्य

दरम्यान जितेद्र आव्हाड म्हणाले की "बाबासाहेब आंबेडकरांनी न्यायपालिकेमध्येही आरक्षण ठेवायला हवं होतं. माहीत नाही, मी हे बोलावं की नाही.. कारण उगाच वाद निर्माण होईल. मात्र तरीही बोलतो असे सांगून आव्हाड यांनी जातीय दृष्टीकोनातून न्यायपालिकेच्या नि:पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यायपालिकेमध्येही आरक्षण असायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली. न्यायपालिकेचे काही निर्णय असे असतात की ते पाहून लगेच त्यातून जातीयतेचा वास येतो. मात्र, न्यायपालिकेतून असे मुळीच अपेक्षित नाही. न्यायपालिका नि:पक्ष राहिली पाहिजे अशी राज्यघटनेची अपेक्षा आहे. मात्र, खरंच असे आहे का असा सवाल ही आव्हाड यांनी यावेळी उपस्थित केला.

Updated : 17 Jan 2024 2:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top