Home > Max Political > 'टायगर अभी जिंदा है' जयंत पाटीलांचा हा इशारा कोणासाठी?

'टायगर अभी जिंदा है' जयंत पाटीलांचा हा इशारा कोणासाठी?

Jayant patil's speech while eknath khadse's NCP joining event

टायगर अभी जिंदा है जयंत पाटीलांचा हा इशारा कोणासाठी?
X

विधानसभेच्या सभागृहात मी भाजप नेत्यांना 'कटाप्पाने बाहुबली को क्यू मारा' हा प्रश्न केला होता. आजही ते टिव्ही बघत असतील आणि त्यांना आता कळेल 'टायगर अभी जिंदा है' आणि 'पिक्चर अभी बाकी है' अशा शब्दात एकनाथ खडसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार बॅटींग केली. आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता इशारा दिला.

आज भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला राम राम ठोकल्यानंतर अधिकृतरित्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते.

काय म्हटलंय जयंत पाटील यांनी...

एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. मात्र त्यांना भाजपाने मागच्या रांगेत बसवण्याचे काम केले.

सुसंस्कृत महाराष्ट्रात जाणीवपूर्वक चांगलं राजकारण चव्हाणसाहेबांनी रुजवलं. परंतु आज राजकारणातून संपवण्याचे राजकारण घडत आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खंत व्यक्त केली.

शरद पवार यांनी घडवलेले नेते ऐन निवडणुकीत पक्षाला सोडून गेले. परंतु पवार यांचा विचार मानणारे कार्यकर्ते त्यांच्यामागे उभे राहिले आणि त्यांचे विचार पुढे महाराष्ट्र स्वीकारेल. हे आज सिद्ध झाले. पवार यांच्या अपार कष्टाने आज पक्ष आणि पक्षातील तरुण कार्यकर्ते उभे राहिले आहेत. असेही जयंत पाटील म्हणाले.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटी रुपयांचे पॅकेज तात्काळ देण्याचे आमच्या सरकारने जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना उभं करण्याचे काम सरकार करत आहे .असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शेतकर्‍यांवर संकट आणि कामगारांवर संकट आले आहे. परंतु त्यांच्या संरक्षणाला धक्का लावण्याचे काम केंद्रातील सरकारकडून केले जात आहे त्यासाठी आमची सत्ता असली तरी शेतकर्‍यांच्या व कामगारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहिले पाहिजे. असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

भाजप पक्ष वाढवण्याचे काम खडसे यांनी केले आहे. काही कानामागून आले आणि तिखट झाले. असा प्रकार घडला आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

येणाऱ्या काळात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी खडसे प्रयत्न करतील असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

आम्ही सर्वांनी खडसे यांना काही देतो असं सांगितलं नाही. त्यामुळे मीडियाने चुकीचं काही पसरवू नये अशी विनंती जयंत पाटील यांनी यावेळी केली.

Updated : 23 Oct 2020 8:37 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top