मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर.....प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा....! वाचा
X
मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आले तर.....प्रकाश आंबेडकरांनी केला मोठा दावा....! वाचापंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा गोध्रा हत्याकांड घडले होते. त्यानंतर देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा मणिपूरचं प्रकरण झालं. नरेंद्र मोदी पंतप्रधान असणे हे देशासाठी लाभदायक नाही. यापुर्वी ते दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. ते आता पुन्हा पंतप्रधान झाले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही, परिणामी देशात अशांतता माजेल, दंगली भजकतील, हा संभाव्य धोका आपण लक्षात घेतला पाहिजे, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मोदींच्या कार्याकाळात देशावरील कर्ज वाढले
देशातील किसान आजही दिल्लीत आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत आहेत. मोदी सरकार हे शेतकरी विरोधी सरकार आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल हा त्यांच्या शेतातच जाऊन खरेदी करावा, असं मोदी सरकारचे धोरण आहे, याला विरोध म्हणून शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून ते आत्तापर्यंतची आकडेवारी पाहिली असता मोदींच्या कार्यकाळात देशावरील कर्ज कितीतरी पटीने वाढले आहे, हे ताज्या आकडेवाडीवरून स्पष्ट झाले आहे, असं प्रकाश आंबडकर यावेळी म्हणाले
CAA आणि NRC या कायद्याबद्दल काय प्रकाश आंबेडकर ?
केंद्र सरकारकडून आणण्यात आलेला एनआरसी(NRC),सीएए (CAA) हा कायदा बेकायदेशीर असून अन्यायकारक आहे. मोदी सरकारला लोक कंटाळले आहेत. प्रत्येकाला परिवर्तन हवे आहे. कोणी उघडपणे बोलत आहे तर कोणी बोलत नाही. तमाम जनता हे मोदीच्या कार्यपध्दतीवर नाराज आहे. हुकूमशाहीमुळे शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही हे सांगता येत नाही. देशात अशी काही जमात आहे की, त्यांचा राहण्याचा ठावठिकाणा नाही, दोन वेळचे जेवण भेटलं तरी त्यांच्यासाठी खूप आहे, अशा लोकांकडे जन्माचा दाखला नसेल तर त्यांना आतंकवादी म्हणणार काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला.