Home > Max Political > तुकाराम मुंढेंसह 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

तुकाराम मुंढेंसह 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडणवीस(Shinde-Fadnanvis) सरकारमध्ये अजित पवार (AjitPawar) गटाचा समावेश झाल्यानंतर ऐन अधिवेशन सुरू असताना राज्यातील तब्बल 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केली असून सतत बदली चक्रामध्ये अडकलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Munde)यांना मराठी भाषा विभागाकडून महिनाभरापूर्वी दिलेले कृषी,पशुसंवर्धन आणि दुग्धविकास (ADF) विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंसह 41 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
X

तुकाराम मुंढे यांची गेल्या १६ वर्षांत २० वेळा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच त्यांना कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती

नाट्यमय घडामोडीनंतर सरकारमध्ये अजित पवार गट आल्यानंतर या गटातील आठ आमदारांना महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील अनेक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, झेडपीचे सीईओ बदलण्यात आले आहेत. त्यात सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली करण्यात आली आहे. मुंढेची एकाच महिन्यात बदली झाली आहे. गेल्या महिन्यात बदली झालेला विभागाच आता मुंढे यांना दिलेला आहे.कृषी पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांची बदली झाली आहे. हा विभाग सध्या भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे.

सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी खालीलप्रमाणे

1. राजेंद्र शंकर क्षीरसागर यांची मुंबई शहर कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

2. वर्षा ठाकुर-घुगे यांची लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

3. संजय चव्हाण यांची अतिरिक्त कंट्रोलर ऑफ स्टॅम्प, मुंबई कार्यालयात बदली करण्यात आली आहे. ते यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेत विशेष कार्यकारी अधिकारी होते.

4. आयुष प्रसाद यांनी जळगावच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

5. श्रीमती भुवनेश्वरी एस. यांची वाशिमच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती

6. अजित कुंभार यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली

7. श्रीकृष्णकांत पांचाळ यांची जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज अशिया यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

9. कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

10. अभिनव गोयल यांची धुळ्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

11. सौरभ कटियार यांची झेडपी अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन अमरावती कार्यालयात जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

12. तृप्ती धोडमिसे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन सांगली झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

13. अंकित यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अहेरी, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी, जळगाव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

14. शुभम गुप्ता यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी अटापली SDO, पो.भारमरागड, ITDP, गडचिरोली पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, ZP, धुळे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

15. मीनल करनवाल यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, नंदुरबार पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

16. डॉ.मैनाक घोष यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली -सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

17. मनीषा माणिकराव आव्हाळे यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, ITDP, सोलापूर पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., सोलापूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

18. सावन कुमार यांची प्रकल्प अधिकारी-सह-सहाय्यक जिल्हाधिकारी, धारणी, ITDP, अमरावती पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., नंदुरबार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

19. अनमोल सागर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी, देवरी उपविभाग, गोंदिया पदावरून मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., लातूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२०. आयुषी सिंग यांची पालघरच्या जवाहर येथील आयटीडीपी प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी पदावरुन गडचिरोलीच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती

२१. वैष्णवी बी यांची भंडारा येथील तुमसर उपविभागाच्या सहायक जिल्हाधिकारी पदावरुन अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली

२२. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारी पदावरुन पुण्याच्या जीएसडीए संचालक पदी बदली

२३. गंगाथरण डी. यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदावरुन मुंबई महापालिकेच्या सह आय़ुक्तपदी बदली

२४. अमोल जगन्नाथ येडगे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदावररुन महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण येथे बदली

२५. शानमुगराजन एस. यांची वाशिम जिल्हाधिकारी पदावरुन अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) मुंबई येथे बदली

२६. विजय चंद्रकांत राठोड यांची जालना जिल्हाधिकारी पदावरुन महाराष्ट्र उद्योजक विकास महामंडळ मुंबईचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

२७. निमा अरोरा यांची अकोला जिल्हाधिकारीपदावरुन माहिती तंत्रज्ञान विभाग येथे संचालक म्हणून बदली

२८. वैभव दासू वाघमारे यांची गडचिरोलीतील अहेरी येथे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

२९. संतोष सी. पाटील यांची उपमुख्यमंत्र्यांचे सह सचिव पदावरुन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली

30. आर.के.गावडे यांची झेडपी नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जिल्हाधिकारी, परभणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आहे.

31. आंचल गोयल यांची जिल्हाधिकारी, परभणी पदावरून अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर महानगरपालिका, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

32. संजय खंदारे, यांची मुख्य सचिव, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

33. तुकाराम मुंढे, सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई पदावरून सचिव (AD), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

34. जलज शर्मा. जिल्हाधिकारी धुळे पदावरून यांची जिल्हाधिकारी नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

35. डॉ.ए.एन.करंजकर आयुक्त, ESIS, मुंबई पदावरून यांची महापालिका आयुक्त, नाशिक महानगरपालिका, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

36. आर.एस.चव्हाण, सहसचिव, महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

37. पृथ्वीराज बी.पी. जिल्हाधिकारी, लातूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

38. रुचेश जयवंशी यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, NRLM, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

39. मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी, राज्य आरोग्य विमा संस्था, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

40. मकरंद देशमुख उपायुक्त (महसूल), कोकण विभाग, मुंबई यांची सहसचिव, मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

41. डॉ.बी.एन.बस्तेवाड मुख्य महाव्यवस्थापक (L&S), MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, Z.P., रायगड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Updated : 22 July 2023 8:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top