Home > Max Political > भोंगे उतरवल्याने हिंदूचं नुकसान होईल- आनंद दवे

भोंगे उतरवल्याने हिंदूचं नुकसान होईल- आनंद दवे

भोंगे उतरवल्याने हिंदूचं नुकसान होईल-  आनंद दवे
X

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि रस्त्यावरील नमाज पठणला विरोध करत येत्या ४ मे ला मशिदींवरील भोंगे उतरवण्याचं अल्टीमेटम दिलं.मात्र यावर आता हिंदू महासभेने प्रश्न उपस्थित केले आहे.जर मशिदीवरील भोंगे उतरवले तर हिंदू सणांचं काय करायचं, असा प्रश्न हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे.

नमाज रस्त्यावर करायला हिंदू महासभेने पहिल्या दिवसापासून विरोध केला आहे, तो आजही आमचा विरोध आहे. परंतू, सरसकट रस्त्यावरच सर्व बंद केलं तर गणपतीत मांडवांमध्ये होणाऱ्या आरत्यांचं काय करायचं, नवरात्री दांडियाचं काय करायचं, दहीहंडीचं काय करायचं, हा प्रश्नही उपस्थित होईल. हिंदू अधिक अडचणीत येईल, असं हिंदू महासंघाचं म्हणणं आहे. बाळासाहेबांच्या काळातही भोंगे उतरवणं शक्य झालं नाही"असं आनंद दवे म्हणाले.

मशिदीवरील भोंगे उतरवले तर गणपती मंडपातील आरत्या, नवरात्री, दांडिया, दहीहंडी याचं काय करायचं, असा प्रश्न आनंद दवे यांनी उपस्थित केला. तसेच, भोंगे उतरवल्याने हिंदूचं नुकसान होईल असंलही ते म्हणाले.

मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता ३ मे पर्यंत मुदत दिली आहे.३ तारखेला रमजान ईद आहे.मला सणात विष कालवायचे नाही.मात्र ४ मे पासून ऐकणार नाही.मात्र ४ मेपासून ऐकणार नाही.ज्या मशिदींवर भोंगे असतील,त्यांच्यसमोर लाऊडस्पीकर लावून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा म्हणा,असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादच्या सभेत केले

Updated : 2 May 2022 5:30 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top