Home > Max Political > हर्षवर्धन जाधव यांनी अर्थसंकल्पा आडून Shahrukh Khan वर साधला निशाणा

हर्षवर्धन जाधव यांनी अर्थसंकल्पा आडून Shahrukh Khan वर साधला निशाणा

राज्य सरकारच्या मालकीच्या ज्या जमिनी भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्या जमिनींचं भाडं येणं सध्या बंद आहे. हे प्रलंबित भाडं नियमित यायला सुरू झाल्यानंतर राज्य सरकारला त्रुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची वेळच येणार नसल्याचं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केलंय.

हर्षवर्धन जाधव यांनी अर्थसंकल्पा आडून Shahrukh Khan वर साधला निशाणा
X

राज्य सरकारच्या मालकीच्या ज्या जमिनी भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत. त्या जमिनींचं भाडं येणं सध्या बंद आहे. हे प्रलंबित भाडं नियमित यायला सुरू झाल्यानंतर राज्य सरकारला त्रुटीचा अर्थसंकल्प Budget सादर करण्याची वेळच येणार नसल्याचं मत माजी आमदार हर्षवर्धन जाधव Harshavardhan Jadhav यांनी व्यक्त केलंय.

राज्य सरकारला त्रुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची गरजचं नाहीये. राज्य सरकारनं काही लोकं आणि संस्थांना ज्या जमिनी भाडे तत्त्वावर दिलेल्या आहेत. त्या जमिनींचं भाडं सध्या राज्य सरकारला मिळत नाही. यासंदर्भात तातडीनं एक धोरण करून हे भाडं नियमित करण्यासंदर्भात तीन वर्षांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणी केली तर येणा-या पैशामुळे राज्य सरकारला त्रुटीचा अर्थसंकल्प सादर करण्याची गरजच पडणार नाही, असं मत माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलंय.

जमिनीच्या भाड्यातून मिळणा-या पैशातून इतर विकास कामांना गती देणं शक्य होईल. यासंदर्भातील सर्व कागदपत्रं जाधव यांनी शासनाला दिलेली आहे. हा विषय विधिमंडळाशी निगडीत असल्यानं सर्व सदस्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारी जमिनीवर कुठलंही भाडं न भरता जी लोकं राहतात, उदा. शाहरूख खान Shah Rukh Khan, ताज हॉटेल Taj Hotel यांच्याकडून जमिनीच्या भाड्याचे पैसे घेतले तर सामान्य नागरिक करमुक्त होईल, शिवाय विकास कामांसाठी जास्तीचे पैसे उपलब्ध होतील, यासाठी कायदेशीररित्या अंमलबजावणी करण्याची आवश्यकता असल्याचं जाधव यांनी सांगितले.


Updated : 10 March 2023 9:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top