Home > Max Political > मुस्लिम बाधवांसाठी हज हाऊस उत्तम सुविधा देणार - मंत्री. अब्दुल सत्तार

मुस्लिम बाधवांसाठी हज हाऊस उत्तम सुविधा देणार - मंत्री. अब्दुल सत्तार

मुस्लिम बाधवांसाठी हज हाऊस उत्तम सुविधा देणार - मंत्री. अब्दुल सत्तार
X

संभाजीनगर शहरातील हज हाऊसचे लोकार्पण आज मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आयोजित विशेष सोहळ्यात ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर शहरात अल्पसंख्यांक विभागाचे तीन राज्यस्तरीय कार्यालये उभारणार असल्याची घोषणा अब्दुल सत्तार यांनी केली.


दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, "हज हाऊस मराठवाड्यातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी उत्तम सुविधा आहे. याद्वारे मुस्लिम बांधवांची हज यात्रा सुसह्य आणि जलद होण्यास मदत होईल. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या यात्रेत सहाय्यभूत ठरणारे हज हाऊस हे संभाजीनगरच्या विकासाला साह्यभूत ठरेल असेही सत्तार म्हणाले. लेबर कॉलनी येथील जागेवर राज्यातील अल्पसंख्याक विभागाचे तीन महत्त्वाची कार्यालये उभारणार असल्याची ग्वाही मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. तसेच लेबर कॉलनी येथील अनधिकृत वसाहत प्रशासनाने मोठ्या प्रयासाने रिकामी केली. आता त्या जागेवर महत्त्वाची कार्यालये उभी राहणार आहेत. यात वक्फ बोर्ड कंट्रोल, मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशन, आणि अल्पसंख्याक राज्य आयुक्त यांचे कार्यालय अशी तीन महत्त्वाची कार्यालये येथे उभी राहणार असल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले. तसेच जळगाव-जालना रेल्वे लाइनसाठी महाराष्ट्राने 3600 कोटी रुपये केंद्र सरकारला दिले. मात्र गुरूवारी (दि.1) सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्याबद्दल काहीही बोलले गेले नाही याची खंत मंत्री अब्दुल सत्ता सत्तार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, सिल्लोड, सोयगाव तालुके रेल्वेने जोडायचा माझा विचार होता. राज्याने 3600 कोटी दिले त्यात केंद्राने 3600 कोटी टाकले असते तर 72 हजार कोटी रुपयांत जळगाव ते जालना रेल्वे सुरु झाली असती. याबाबत लोकसभेत जळगाव जालना रेल्वेसाठी जोर देण्याची विनंती मंत्री सत्तार यांनी खा. जलील यांना केली आहे.

Updated : 3 Feb 2024 4:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top