गुंड हेमंत दाभेकर, वाढदिवसा निमित्त मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी
X
पुणे : मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील गुंड हेमंत दाभेकर यांनी मुख्यमंत्री निवासस्थान असणाऱ्या वर्षा बंगल्यावर जाऊन श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. कुख्यात गुंड शरद मोहळ याच्या सोबत गुन्ह्यात हेमंत दाभेकर हा साथीदार आहे. शरद मोहळ सोबत हेमंत दाभेकर याचे गुंड किशोर मारणे खून प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणी हेमंत दाभेकर हा जामीनावर बाहेर आहे. वाढदिवसा निमित्त खासदार श्रीकांत शिंदे यांचा सत्कार केल्याचा दभेकर याचा फोटो व्हायरल झाल्याने. गुंडांचा संबंध राज्यकर्त्यांशी कसा ? आशी चर्चा आता सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाचे गुंड गाजाजन मारणे ह्याच्या सोबत चे फोटो व्हायरल झाले होते. गुंड गजानन मारणे ह्याच्या पत्नीने मनसे मध्यें काही महिन्यांपूर्वी प्रवेश केला होता तर नुकत्याच खून झालेल्या गुंड शरद मोहोळ ह्याच्या पत्नीने भाजपात प्रवेश केला होता. गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींची किंवा त्यांच्या नातेवाईकांचे राज्यकर्त्यांशी संबंध कसे ? अशी चर्चा आता समोर येऊ लागली आहे.
यातच आता शरद मोहोळ ह्याचा साथीदार असणाऱ्या हेमंत दाभेकरचे मुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत चे फोटो व्हायरल झाल्याने. ही भेट कोणी घडून आणली अशी चर्चा होत असताना. पुण्यातील शिवभक्त अनिकेत जावळकर ह्यांनी ही भेट घडून आणली असा आरोप आता होत आहे. ह्या संदर्भात जावळकर ह्याला युवासेनेतून पदमुक्त कऱण्यात आले आहे. जावळकर याच्याकडे युवासेना पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक हे पद होते.
गुंड हेमंत दाभेकार ह्याच्यावर खंडणी, अपहरण, खून अश्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. श्रीकांत शिंदे ह्यांची वाढदिवसानिमित्त भेट दाभेकरने घेतली. भेटीचं कारण वाढदिवस की पक्षप्रवेश? नेमकं कारण काय? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. ह्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जावळकर यांना पदमुक्त केलें अशी देखील चर्चा सामोर आली आहे.