माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा; पडळकरांनी वडेट्टीवारांना ललकारले
X
विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहे. तसंच दारुच्या व्यवसायात त्यांची भागिदारी आहे. असे गंभीर आरोप भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी मंत्री विजय वड्डेटीवार यांच्यावर केले होते.
त्यानंतर वड्डेटीवार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत पडळकरांनी ऐकिव गोष्टीवर आरोप करू नये. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. कोणत्या ठिकाणी ही फॅक्ट्री आहे हे त्यांनी सांगावं. पत्ता काढावा. कोणत्या नातेवाईकाची आहे हे सांगावं. नाही सांगितलं तर मी अब्रुनुकसानीचा दावा करेन. कोर्टात जाईल. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध करावी, असं आव्हान गोपिचंद पडळकर यांना दिले होते. त्यानंतर पडळकर यांनी
माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा असं म्हणत गोपिचंद पडळकर यांनी विजय वडेट्टीवार यांना ललकारले आहे.
काय म्हटलंय पडळकर यांनी?
महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्काचे 125 कोटी रुपये यांना खर्च करता आले नाहीत. हे माझ्यावर 50 कोटींचा दावा करणार आहेत. खुशाल करा, मी असल्या गोष्टींना घाबरत नाही. कारण माझी माय आणि माझा बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा व आरेवाडीचा बिरोबा आहे.
अशा शब्दात पडळकर यांनी वड्डेटीवार यांना ललकारलं आहे.