गोव्यात आम्ही पुन्हा येणार, देवेंद्र फडणवीस यांचा नारा
X
आज गोवा भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित गोवा विधानसभेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी पुन्हा एकदा भाजप सत्तेत येईल अशी घोषणा भाजप नेत्यांची केली आहे. देशात गोवा, उत्तर प्रदेश, मनिपूर, पंजाब आणि उत्तराखंड राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. राजकीय पक्ष अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असताना उमेदवारांची घोषणा करत आहेत. आज गोवा विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने ४० पैकी ३४ उमेदवारांची घोषणा केली आहे.
आज जाहीर झालेल्या उमेदवारांमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला संधी दिलेली नाही. मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी पणजी मधून तिकिट मागितले होते. मात्र, त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही.
आज भाजपने ४० पैकी ३४ उमेदवारांची नाव जाहीर केले आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यावेळी सांकेलिम मधून निवडणूक लढणार असून उपमुख्यमंत्री मनोहर अजांकर मारगांव विधानसभा मतदारसंघातूनही निवडणूक लढणार आहेत.
११ ओबीसी
०९ अल्पसंख्याक
०३ एसटी
०६ जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी
०६ लोकांचा पत्ता कट
Koo AppWishing BJP Goa candidates all the success to once again serve the people of #Goa under the leadership of Hon PM Narendra Modi ji ! People of Goa have made their mind & are determined to elect BJP India Government under @DrPramodPSawant ji in #GoaElections2022 . #BJP4Goa #BJP - Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) 20 Jan 2022