Home > Max Political > राज ठाकरे भावी मुख्यमंत्री, मनसेची बॅनरबाजी

राज ठाकरे भावी मुख्यमंत्री, मनसेची बॅनरबाजी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा पाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. हे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले असून या बॅनर मध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे आहेत. अशी इच्छा व्यत्क्त केली आहे.

राज ठाकरे भावी मुख्यमंत्री, मनसेची बॅनरबाजी
X

डव्याच्या निमित्ताने मनसेचा पाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. हे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले असून या बॅनर मध्ये महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे आहेत. अशी इच्छा व्यत्क्त केली आहे.


दरम्यान, राज ठाकरे आज संध्याकाळी शिवाजी पार्कवर मेळावा घेणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. आज शिवाजी पार्कमध्ये मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार असून या बैठकीची तयारी सध्या जोरात सुरू आहे. या कार्यक्रमाचा टीझर सार्वजनिक करण्यात आला आहे. यापूर्वी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी सविस्तर राजकीय भाष्य करणे टाळले होते. मात्र आजच्या गुढीपाडव्याच्या बैठकीत आपल्या राजकीय भूमिकेबद्दल अधिक स्पष्टता करणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजच्या मेळाव्यात कोणावर निशाणा साधणार यावर राजकीय निरीक्षकांचं आणि जनतेचं लक्ष लागलं आहे.

मशिदीवरील भोंगा सौदी अरेबियात बंद होतो, तर महाराष्ट्रात का बंद होत नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी केला

राज ठाकरे यांनी सभेपूर्वी दिलेल्या मुलाखतीत मशिदींवरील भोंग्या बाबत प्रशासनाला प्रश्न उपस्थित केले. राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार सौदी अरेबियात मशिदी बंद होतात तर महाराष्ट्रात का नाही होत ? लोकमान्य सेवासंघ, पारले शतकपूर्ती सोहळ्यात आज राज ठाकरेंची मुलाखत पार पडली. मुलाखतीत त्यांनी वर्तमानपत्र स्थापन करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.

असं राज ठाकरे सभेत बोलणार..

काही दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यावर राज ठाकरे म्हणाले, "त्या दिवशी घटना घडल्यानंतर मी काहीही बोललो नाही. मला असंख्य लोकांनी विचारलं आहे कि तुम्हाला नक्की काय वाटतं ? हे कोणी केलं असेल.? एक निश्चित सांगतो हल्लेखोरांना आधी कळेल यात काही शंका नाही. मग जनतेला कळेल. दरम्यान गुढीपाडव्याच्या सभेत कोणावर चर्चा करायची आणि कोणाचे वाभाडे काढायचे, हे मी बघेन असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं. राज ठाकरेंच्या या सभेला पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागला आहे.

Updated : 22 March 2023 10:54 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top