भाजपने केली चौथी यादी जाहीर ; ही आहेत १५ उमेदवारांची नावे
X
तामिळनाडू (मतदारसंघ)
लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने आज (शुक्रवारी) लोकसभा उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. यात कर्नाटकमधील १४ तर पुद्दुचेरीतील १ अशा एकुण १५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.
यापूर्वीची तिसरी यादी जाहीर करताना तामिळनाडूतील ९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. तर तेलंगणाचे राज्यपाल तमिलीसाई सुंदरराजन यांना चेन्नई दक्षिणमधून तिकीट देण्यात आले. भाजपचे प्रदेशप्रमुख के. अन्नामलाई कोइम्बतूरमधून, तर केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांना निलगिरीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीसाठी भाजपने गुरूवारी तेजू मतदारसंघातून मोहेश चाय यांना उमेदवार म्हणून घोषीत केले आहे.
तामिळनाडू (मतदारसंघ) आणि उमेदवारांची नावे
१. तिरुवल्लुवर पी.व्ही. बाल गणपती
२. चेन्नई उत्तर आर.सी. पॉल कनगराज
३. तिरुवन्नमलाई अ.अस्वथामन
४. नमक्कल केपी. रामलिंगम
५. तिरुपूर ए.पी. मुरूगानंदम
६. पोल्लाची सी. वसंतराजन
७. करूर व्ही. सेंथीलीनाथन
८. चिदंबरम पु. कार्तियायिनी
९. नागपट्टणम एस.जी.एम. रमेश
१०. तंजावर एम. मुरूगानंदम
११. शिवगंगाई देवनाथन यादव
१२. मदुराई देवनाथन यादव
१३. विरधुनगर सरथकुमार
१४. तेनकशी बी. जॉन पांडियन
१. पुद्दुचेरी ए. नमस्वयम्