Home > Max Political > अखेर महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश..!

अखेर महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश..!

अखेर महाविकास आघाडीत वंचित आघाडीचा समावेश..!
X

मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज 30 जानेवारी रोजी महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी उपस्थिती लावली होती. या बैठकीनंतर महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाला असे जाहीर करण्यात आले. शिवसेना गटाचे (ठाकरे गट) खासदार संजत राऊत यांनी माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या विस्ताराबाबत महत्वाची माहिती दिली.


आज काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना(ठाकरे गट) पक्षांची बैठक पार पडली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, मी आणि विनायक राऊत या बैठकीला उपस्थित होतो, असं संजय राऊत यावेळी म्हणाले. दरम्यान या बैठकीला उपस्थित झालेल्या वंचित बहुजन आघडीच्या नेत्यांनी असा आरोप केला की, आम्हाला व्यवस्थित वागणूक मिळालेली नाही, पण संजय राऊत यावर म्हणाले की असं काहीही झालेलं नाही उलट त्यांनी आमच्यासोबत जेवण केले, नंतर चर्चा ही झाल्या.

त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी, जनता दल युनायटेड, सीपीआयएम, सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पार्टी, शेकाप या सगळ्यांचा आज महाविकास आघाडीमध्ये जाहीर समावेश झाला आहे, आणि या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली, असंही राऊत यावेळी माध्यामांशी बोलताना म्हणाले.

Updated : 30 Jan 2024 9:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top