ED समोर चौकशीला गैरहजर, अनिल देशमुख यांनी सांगितले कारण...
X
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना EDने दोनवेळा चौकशीसाठी बोलावले आहे. पण अनिल देशमुख हे अजून चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. आपण ईडीसमोर अजून का हजर झालेलो नाही यासंदर्भात अऩिल देशमुख यांनीच स्वत: माहिती दिली आहे. "ईडीने मला कागदपत्रांसहीत उपस्थित रहावे असे दोन समन्स पाठविले आहे. मी ईडीला दोन सविस्तर पत्रे पाठवून मला 'ECIR' ची कॉपी द्यावी आणि त्यांना जी कागदपत्रे हवी आहेत त्यांची यादी द्यावी, अशी विनंती केली आहे. जेणेकरून मला या कागदपत्रांची जुळवाजुळव करून ती ईडीला पाठविता येईल. त्याचबरोबर इतर बाबींचा सविस्तर उल्लेख मी माझ्या ईडीला दिलेल्या दोन्ही पत्रांत केला आहे. मी ईडीला यापूर्वीही सहकार्य केले आहे व यापुढेही असेच सहकार्य करत राहील." अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
दरम्यान अनि देशमुख दोनवेळा गैरहाजर राहिल्याने आता ED तर्फे तिसरं समन्स बजावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच अनिल देशमुख यांनी ईडीकडे मागणी केलेली 'ECIR' ची कॉपी देण्यास ईडीने नकार दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अनिल देशमुख यांचे जवळचे सहकारी पीएस कुंदन शिंदे आणि पीए संजीव पलांडे याच्या ईडी कोठडीत पाच दिवसांची झाली आहे. या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडीत देण्यात आली आहे.