आज निवडणूक झालीतर ठाकरे गट १५० जागा जिंकेल- संजय राऊत
ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यातीस शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच तोफ डागली. आज राज्यात विधानसभेच्या निवडणूका झाल्या तर एकटा ठाकरे गट १५० जागा जिंकेल असा दावा राऊत यांनी केला. तसेच २०२४ ला सगळे हिशेब चुकते करण्याची भाषा सुद्धा राऊत यांनी केली.
X
आगामी २०२४ साली राज्यात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत सगळे हिशेब चुकते करण्याची भाषा ठाकरे गटाचे राज्यसभा सदस्य संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केली आहे. ते गडहिंग्लजमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. त्याचप्रमाणे राज्यात आज जर निवडणूक जाहीर झाली तर ठाकरे गट एकटा राज्यातील १५० जागा जिंकेल असा विश्वास राऊत यांनी यावेळी बोलून दाखवला. मोदींचे मित्र असल्याचा फायदा अदानीला कशाप्रकारे होत आहे, याबाबत सांगताना अदानींना नोटीस मिळत नाही. पण ठाकरे गटाच्या आमदारांना आणि मला नोटीस मिळत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.
देशाचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांना उद्धव ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) हे आव्हान ठरत आहेत. त्यामुळेच त्यांनी ठाकरे गटाला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पण आम्ही तसे होवू देणार नाही. फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही पुन्हा एकदा आपले अस्तित्व सिद्ध करुन दाखवू, असे राऊत यावेळी म्हणाले. आणि राज्यातील ठाकरे गटाचा प्रत्येक शिवसैनिक हा उद्धव ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) यांच्या पाठीशी उभा असल्याचे राऊत यांनी सांगितले. आणि हिच खरी आमची ताकत असल्याचे सुद्धा राऊत यांनी सांगितले.
आमच्यातील काही गद्दारांनी आमच्या पाठीत खंजीर खूपसला आणि बाळासाहेबांची शिवसेना (Shiv Sena) फोडली. या गद्दारांना खोके मिळाले असतील पण ठाकरे गटाच्या शिवसेनेने या सर्व गद्दारांना प्रतिष्ठा मिळवून दिली होती. ते मात्र हे गद्दार विसरले, याची आठवण राऊत यांनी यावेळी करुन दिली. त्याचप्रमाणे या गद्दारांना महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही आणि याची प्रचिती २०२४ मध्ये आल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत यांनी यावेळी सांगितले.