एकनाथ शिंदे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ज्योतिषाकडे, चर्चेला उधाण...
एकनाथ शिंदे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ज्योतिषाकडे, चर्चेला उधाण... eknath shinde met the astrologers Jalgaon
X
शिवसेनेचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कोजागिरी पौर्णिमेला जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे खाजगी आणि गुप्त दौरा केला, या दौऱ्यात ते पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागात राहणाऱ्या गजानन नामक एका तरुण ज्योतिषाकडे त्यांनी आपला हात दाखवला आणि भविष्याबाबत माहिती घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या भेटीबाबत शिवसेनेकडून गुप्तता पाळण्यात आली होती, शिंदेंनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या घरी बैठक घेतली. महापालिकेत बदलेल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतल्याचीही चर्चा आहे. पाचोरा येथून जळगाव येथे परत येताना जैन हिल्स येथे भेट दिली, भोजनाचा आस्वाद ही घेतला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. त्यानंतर विमानतळाकडे रवाना झाले व तातडीने मुंबईला रवाना झाले.
दरम्यान या खाजगी भेटीवेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या जळगाव व पाचोरा येथे काल झालेल्या गुप्त भेटीने खळबळ उडाली आहे. पाचोरा येथे भेटीच्या वेळी आमदार किशोर पाटील यांच्यासह केवळ एक ते दोन जण एवढेच उपस्थित होते.
ज्योतिष गजानन यांचे घरी थेट एकनाथ शिंदे यांनी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान भेट घेऊन चर्चा केली. एका खाजगी खोलीत फक्त शिंदे व ज्योतिषी दोघांनी सुमारे तासभर चर्चा केली. यानंतर शिंदे यांनी तात्काळ रस्त्या मार्गे पाचोऱ्याहून जळगाव गाठले व तेथून ते मुंबई रवाना झाल्याची माहिती आहे.
शिंदे हे शिवसेनेतील मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि वजनदार मंत्री आहेत, दसरा मेळाव्यात बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मुख्यमंत्री करून दाखवतो असे जाहीर वक्तव्य केले होते, त्यामुळे तर शिंदे हे आपले नशीब आजमावण्यासाठी भविष्यकाराकडे गेले नव्हते ना? अशी चर्चाही रंगली आहे.
या भेटीबाबत शिवसेनेकडून गुप्तता पाळण्यात आली होती, शिंदेंनी पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांनी घरी बैठक घेतली. महापालिकेत बदलेल्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतल्याचे समजते. पाचोरा येथून जळगाव येथे परत येताना त्यांनी जैन हिल्स येथे भेट दिली. यावेळी ठिकाणी भोजन घेतले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी नगरसेवक अमर जैन उपस्थित होते. तेथून ते विमानतळाकडे रवाना झाले व तातडीने मुंबईला रवाना झाले. याबाबत शिवसेनेने अद्यापर्यंत कोणताही खुलासा केलेला नाही.
shivsena, Jalgaon, Uddhav Thackeray, Jalgaon Politics