Home > Max Political > अनिल परब हाजीर हो..! विधानपरिषद निवडणूकीपुर्वी ED चे समन्स

अनिल परब हाजीर हो..! विधानपरिषद निवडणूकीपुर्वी ED चे समन्स

राज्यात राज्यसभा निवडणूक अटीतटीची झाली होती. यामध्ये भाजपने बाजी मारली तर शिवसेना उमेदवाराचा पराभव झाला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीकडून मतं फुटू नयेत म्हणून काळजी घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभुमीवर शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ने समन्स पाठवले आहे.

अनिल परब हाजीर हो..! विधानपरिषद निवडणूकीपुर्वी ED चे समन्स
X

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना दापोली रिसॉर्टप्रकरणी ED ने समन्स बजावला आहे. तर त्यासाठी 15 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीपुर्वी ED चा समन्स आल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल परब यांना दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी ED ने 26 मे रोजी परब यांच्या मालमत्तांवर छापेमारी केली होती. तर दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी मनी लाँडरिंग संशय असल्याने ED ने अनिल परब यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे आज अनिल परब यांची चौकशी होणार आहे. मात्र अनिल परब चौकशीला हजर राहणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेते अनिल परब यांच्या 7 मालमत्तांवर ED ने छापेमारी केली होती. तर 13 तास चौकशी केली होती. त्यानंतर आता 15 जून रोजी ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. तसेच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र 26 मे रोजी झालेल्या चौकशीनंतर साई रिसॉर्ट आपलं नसल्याचं वक्तव्य अनिल परब यांनी केलं होतं. तर आता पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स पाठवण्यात आल्याने अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अनिल परब चौकशीला हजर राहणार का?

अनिल परब यांना समन्स पाठवण्यात आल्याने ते आता चौकशीला हजर राहणार की आणखी वेळ वाढवून मागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर अनिल परब यांना ईडीचे समन्स आल्याने परब यांच्या अडचणी वाढआल्या आहेत. त्यामुळे हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे.

किरीट सोमय्या यांनी केले होते आरोप

अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. तर हे रिसॉर्ट बांधताना एसआरझेडचे उल्लंघन केल्याचा आऱोप करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्य सरकारने यासंबंधी अजूनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. तसेच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर रिसॉर्टच्या बांधकामात मनी लाँडरिंग केल्याचा आऱोप केला होता. त्यानुसार दाखल केलेल्या तक्रारीवरून अनिल परब यांना समन्स बजावण्यात आले आहे.

Updated : 15 Jun 2022 9:02 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top