ED ची आणखी एक कारवाई : राष्ट्रवादीच्या ताब्यातील सहकारी बँकेला नोटीस
X
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा असलेल्या जरंडेश्वर कारखान्यावर EDने जप्तीची कारवाई केली होती. त्यानंतर आता ज्या बँकांनी या कारखान्याला भरमसाठ कर्ज दिले होते, त्या पुणे आणि सातारा या दोन्ही जिल्हा बँकांना EDने नोटीस बजावली आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या दोन्ही बँकांना नोटीस बजावण्यात आली आहे. कोरेगावच्या जरंडेश्वर साखर कारखान्या सातारा बँकेने 96 कोटी तर पुणे बँकेने जवळपास 200 कोटी रुपये कर्ज दिले होते. याबाबत बँकांनी खुलासा करावा यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या सातारा जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून पुणे जिल्हा बँकेसह जरंडेश्वर कारखान्याला चार बँकांनी कर्ज दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने जरंडेश्वर साखर कारखान्याला तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. या कर्जवाटप प्रकरणी ईडीने बँकेला नोटीस बजावली आहे. शुक्रवारी ही नोटीस देण्यात आली असून कर्जाची कागदपत्र सादर कऱण्यास बँकेला सांगण्यात आले आहे.
जरंडेश्वर साखर कारखान्याने बँकेचे थकीत कर्ज न भरल्याने कारखाना जप्त करण्यात आला होता. माजी आमदार आणि महलूसलमंत्री शालिनीताई पाटील या कारखान्याच्या संस्थापक आणि चेअरमन होत्या. साताऱ्यातील कोरेगाव येथील जरंडेश्वर साखर कारखाना थकीत कर्जामुळे शिखर बँकेने लिलावात काढला आला होता. पण हा लिलावही मुद्दाम केला गेला आणि त्यातून कमी उलाढाल असलेल्या एका कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किमतीला तो खरेदी केला होतता. या व्यवहाराला आक्षेप घेत अण्णा हजारे यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी आर्थिक गुन्हा दाखल केला होता.