लोकशाही यंत्राच्या भरोशावर नको, निवडणूका बॅलेट पेपरवर घ्या, काँग्रेस नेत्याची मागणी
X
2024 च्या लोकसभा निवडणूकीची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेस नेते आणि माजी मंत्री असलेल्या मनिष तिवारी यांनी निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी ट्वीट करून 2024 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. या ट्वीटमध्ये मनिष तिवारी यांनी म्हटले आहे की, ईव्हीएम हे एक यंत्र आहे. यंत्रात कोणत्याही वेळी गडबड करता येते. मशीन हॅक केली जाऊ शकते. त्यामुळे यावर प्रतिबंध करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान हे बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे.
याबरोबरच मनिष तिवारी यांनी ट्वीटमध्ये पुढे म्हटले आहे की, मी माहिती अधिकाराच्या अंतर्गत ईव्हीएम संदर्भात लोकसभेत माहिती मागवली. त्यावेळी निवडणूक आयोगाने ईव्हीएमच्या कोडसंदर्भात सोर्स कोड नसल्याचे सांगितले.
कोणतेही यंत्र बनवणारी व्यक्ती त्या यंत्रात फेरफार करत नसल्याच्या गोष्टीवर विश्वास कसा ठेवायचा. कारण त्यांना या कोडसंदर्भात माहिती असणार आहे. त्यामुळे इंडिया आघाडीने 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी बॅलेट पेपरवर निवडणूका हा मुद्दा अजेंड्यावर घेतला पाहिजे. ईव्हीएमचा वापर करणारे अनेक देश पुन्हा बॅलेट पेपरवर गेले आहेत. कारण ईव्हीएम अविश्वसनीय असल्याचे मनिष तिवारी यांनी म्हटले आहे.