Home > Max Political > नाराज नेत्यांना भाजपकडून लॉलीपॉपचे वाटप; विजय वडट्टेवारांचा सवाल...!

नाराज नेत्यांना भाजपकडून लॉलीपॉपचे वाटप; विजय वडट्टेवारांचा सवाल...!

नाराज नेत्यांना भाजपकडून लॉलीपॉपचे वाटप; विजय वडट्टेवारांचा सवाल...!
X

महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपावरून ओढाताण सुरूच आहे. अशा परिस्थितीत रामदास कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामूळे त्यांचा मुलगा सिध्देश कदम यांची महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीमुळे आता राज्यसरकार वादात सापडले आहे. या नियुक्तीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे.

निवडणूकीच्या तोंडावर महायुतीतील नाराज नेत्यांच्या मुलांना खुश करण्यासाठी भापजकडून लॉलीपॉपचे वाटप करण्यात होत आहे. सिध्देश कदम यांची महाराष्ट्र प्रदुणण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. शासनाकडून नियम डावलून ही नियुक्त करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचं ट्वीट विजय वडट्टीवार केलं.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, जागा वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून रामदास कदम हे भाजपावर टीका करत होते. त्यामुळे आता त्यांच्या मुलाला प्रदुषण मंडळाच्या अध्यक्षपदी बसवून सरकारने लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न केल्याचा हल्लाबोलही केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिंदे आणि अजित पवार गटातील नाराज नेत्यांना सरकारी पदांचे वाटप करून सेटलमेंट केले आहे. तर ही शासकीय पदे सेटलमेंट करण्यासाठी आहेत का? असा सवालही यावेळी वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहेत.

Updated : 8 March 2024 6:49 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top