Rahul Gandhi अचानक चहासाठी थांबले पण गर्दीत Digvijay Singh खाली पडले...
X
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मध्य प्रदेशातील भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज शनिवारी चौथा दिवस आहे. खांडवा जिल्ह्यातील मोर्तक्का येथून सकाळी सहा वाजता यात्रेला सुरुवात झाली.
बरवाहपासून चार किलोमीटर अंतरावर असताना चोर बावडीजवळ एका हॉटेलमध्ये राहुल गांधी अचानक चहापानासाठी थांबले. दरम्यान, थोडी चेंगराचेंगरी झाली, त्यात दिग्विजय सिंह (Digvijay Singh ) धक्का लागून खाली पडले. हा प्रकार घडल्यानंतर लगेच त्यांना त्यांच्या सहकार्यांनी उचलेले. अचानक गर्दी झाल्यामुळे त्या ठिकाणी थोडी गडबड झाली.. या गडबडीत त्यांना धक्का लागला व ते खाली पडले.. त्या सगळ्यात त्यांना कोणाताईही इजा झाली नसून या सगळ्या प्रकारानंतर दिग्विजय सिंह यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे..
आज दिवसभरात पुढे ही यात्रा खरगोन जिल्ह्यातील मनिहार, बलवाडा मार्गे महूला पोहोचेल. राहुल गांधी बाबासाहेब आंबेडकर यांना राहुल येथील आंबेडकर स्मारकात (Dr babasaheb ambedkar) आदरांजली वाहणार आहेत. त्यानंतर ते आज सभेला देखील संबोधित करतील. त्यांच्यासोबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह आणि देशातील आणि राज्यातील सुमारे ४० नेते उपस्थित असतील...
राहुल गांधी यांचा आजचा कार्यक्रम कसा असेल...