Home > Max Political > धनंजय मुंडे पाच सहा मुलांचे वडील तरीही मंत्रीपदी कायम, करूणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे पाच सहा मुलांचे वडील तरीही मंत्रीपदी कायम, करूणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप

धनंजय मुंडे पाच सहा मुलांचे वडील तरीही मंत्रीपदी कायम, करूणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप
X

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करूणा मुंडे यांच्यातील वाद राज्याला सर्वश्रुत आहे. त्यातच करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे पाच-सहा मुलांचे वडील पण तरीही मंत्रीपदावर असल्याचा आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

करूणा मुंडे आणि धनंजय मुंडे या पती-पत्नीमधील वाद राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच करूणा मुंडे यांनी कोल्हापुर पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करूणा मुंडे पंढरपुर येथे विठ्ठल दर्शनासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी धनंजय मुंडे पाच सहा मुलांचे वडील असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

करूणा मुंडे यावेळी म्हणाल्या की, माझ्यावर आणि धनंजय मुंडेंवर चित्रपट बनवला तर महाराष्ट्रातील राजकारण काय आहे? ते समोर येईल, असे वक्तव्य करूणा मुंडे यांनी केले. तर 2024 मध्ये परळीमधून धनंजय मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याने विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी पंढरपूर येथे आले असल्याचे करूणा मुंडे यांनी सांगितले.

पुढे करूणा मुंडे म्हणाल्या की, देशात शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा आणि महागाई सारखे महत्वाचे विषय असताना मोठे मोठे नेते काश्मीर फाईल्स या चित्रपटावर बोलतात ही मुर्खता आहे. तर करूणा मुंडे म्हणाल्या की, पती धनंजय मुंडे यांनी मला जेलमध्ये टाकले. त्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. काश्मीर फाईल्स हा एक चित्रपट असून तो चित्रपटच राहणार आहे. त्यामुळे नेत्यांना बोलायचे असेल तर त्यांनी दिशा सालियन, पुजा चव्हाण आणि करूणा शर्मा बोलायला हवे, असे आवाहन केले.

तसेच माझ्यावर आणि धनंजय मुंडे यांच्यावर चित्रपट काढला तर महाराष्ट्रातील राजकारण काय आहे ते सगळ्यांना कळेल, असे वक्तव्य करूणा मुंडे यांनी व्यक्त केले. तर करुणा मुंडेवर चित्रपट काढण्यासाठी दिग्दर्शकांची लाईन लागली आहे, असेही यावेळी करूणा मुंडे म्हणाल्या.

Updated : 21 March 2022 3:44 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top