पंकजा मुंडे यांच्या पराभवावर अजित पवारांचं विधानसभेत मोठं विधान
कसा झाला धनंजय मुंडे यांचा विजय? अजित पवारांचं विधानसभेत मोठं विधान
X
राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात आक्रमक भूमिका घेणाऱ्या माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आज अर्थमंत्री अजित पवार यांनी सूचक इशारा दिला. विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयाबाबत त्यांनी भाष्य केलं. हे भाष्य करताना अजित पवार यांनी एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
'फार काहींच्या डोळ्यावर कोणी यायला लागलं. आणि जर बाजूला काही करायचं म्हटलं तर मागे 5 वर्षामध्ये आता आमच्या पक्षामध्ये आलेल्या खडसे साहेबांची काय अवस्था आहे? कोणी केली ते आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्याच्यानंतर काहींना वाटलं की, खडसे साहेबांचं झालं आता आपण वाचलो. परंतू निवडणूक आल्यानंतर काही जणांना तिकिटच मिळाली नाही. का मिळाली नाही? कुणालाच कळू शकलं नाही. काही जण बरोबर पराभूत झाले. त्याच्यात धनंजय मुंडे मुळं कोण पराभूत झालं? की आणखी कोणामुळं झालं माहिती नाही.'
असं म्हणत पंकजा मुंडे यांचा पराभव करण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी धनंजय मुंडे यांना मदत केली. असा अप्रत्यक्ष दावा अजित पवार यांनी केला आहे. तसंच हा दावा करताना त्यांच्या पक्ष नेतृत्वाच्या जास्त पुढं जाण्याचा प्रयत्न करणाऱ्याचे कशा पद्धतीने पंख छाटले जातात. हे देखील मुनगंटीवार यांना सांगितले.
धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता.