Home > Max Political > देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे दोन मंत्री आज दिल्ली दौऱ्यावर

देवेंद्र फडणवीस आणि महाविकास आघाडीचे दोन मंत्री आज दिल्ली दौऱ्यावर

आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात फडणवीस रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मधील एका चर्चा सत्राला उपस्थित राहणार आहेत. तसंच ते काही नेत्यांच्या भेटी देखील घेणार आहेत.

घराणेशाहीवर आधारीत राजकीय पक्षांमुळे भारतीय लोकशाहीसमोर निर्माण झालेली आव्हान या विषयावर रामभाऊ म्हाळगीमध्ये एका चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. या चर्चासत्राला फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या चर्चा सत्राचं उद्घाटन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते होणार आहे.

घराणेशाही विरहीत राजकीय पक्षाचे नेत्यांची या चर्चा सत्राला उपस्थिती राहणार आहेत. या चर्चा सत्राला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, आसाम गण परिषदेचे नेते, अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षाचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत.

जेएनयू च्या कुलगूरू डाॅ. शांतीश्री पंडीत यांच्या हस्ते चर्चा सत्राचा समारोप होणार असल्याचं खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले. तर दुसरीकडे इंदू मिल स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज दिल्ली दौऱ्यावर आहेत.

इंदू मिल स्मारकमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं काम उत्तर प्रदेशमधील गाजियाबाद येथे सुरू आहे. या पुतळ्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी स्वतः मंत्री धनंजय मुंडे आणि वर्षा गायकवाड दिल्ली दौऱ्यावर आहेत.

आज १९ मेला दोनही मंत्री दिल्लीतील महाराष्ट्र सदनातून गाजियाबाद कडे रवाना होणार आहेत. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल मध्ये उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याचं काम सुरू आहे. या पुतळ्याचे काम कसे सुरू आहे. याची दोनही मंत्री प्रत्यक्षरित्या पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी सूचना देणार आहेत.

इंदू मिल स्मारक समितीमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांचा समावेश आहे. पैकी वर्षा गायकवाड, धनंजय मुंडे प्रत्यक्षात येऊन पुतळ्याची पाहणी करणार आहेत.

Updated : 19 May 2022 8:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top