...आणि देवेंद्र फडणवीस रिकाम्या हाताने परतले!
X
शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषण करणार आहे. अण्णा यांनी उपोषण करू नये, यासाठी भाजप नेते शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अण्णा हजारे यांनी या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देऊ नये. यासाठी माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अण्णा यांना समजवण्याचा प्रयत्न केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते माजी मंत्री गिरिश महाजन यांनी देखील अण्णांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णा उपोषण करण्यावर ठाम आहेत.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला ३० जानेवारीपासून उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पत्र घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीत आले होते. तब्बल तासभर चर्चा झाली.
मात्र, ठोस कारवाई शिवाय माघार नाही, असे सांगून अण्णा हजारे यांनी निर्णय बदलण्यास नकार दिला. त्यामुळे फडणवीसांसह चर्चेसाठी आलेल्या भाजप नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. हजारे यांचे मुद्दे केंद्र सरकारला कळवून पुन्हा चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.