...निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत- अजित पवार
X
काही दिवसांपासून राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन राजकारण सुरु आहे.राज ठाकरे १ मे रोजी औरंगाबाद(Aurangabad) मध्ये सभा घेणार असून त्यामुळे राजकारण अजून तापणार की काय असे दिसू लागले आहे.यापार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरेंचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये (Yogi Adityanath)योगी आदित्यनाथ यांनी भोंग्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरुन राज ठाकरेंनी(Raj Thackrey) त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन योगी आदित्यनाथ यांच अभिनंदन केलं.तसेच महाराष्ट्रात योगी नसून फक्त सत्तेचे भोगी आहेत. अशा शब्दात राज्य सरकारवर टिका केली होती. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका मांडली आहे.
उत्तरर प्रदेशमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला म्हणे.घेतला असेल.पण एक गोष्ट लक्षात ठेवा.सर्वोच्च न्यायालयाने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत लाऊड स्पीकरला परवानगी दिली आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती,दिवाळीचे असे १५ दिवस काढले आहेत.यातले ३ दिवस वेळ वाढवण्याचे अधिकार जिल्ह्याधिकाऱ्यांना दिले आहेत.या दिवशी सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी आहे. उद्या जर कुठला निर्णय घ्यायचं झालं, तर फक्त मशिदींवरचे भोंगे बंद होणार नाहीत.असं
अजित पवार म्हणाले. दरम्यान, मशिदींवरील भोंग्यांबाबत निर्णय घेतला, तर तो इतरही कार्यक्रमांना लागू होईल, असं अजित पवारम्हणाले. शिर्डीला साईबाबांची काकड आरती पहाटे ५ वाजता सुरू होते. उद्या त्यातही काही अडचणी येऊ शकतात. आपल्याकडे तर रात्री वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम असतात. काही ठिकाणी प्रवचन, कीर्तन असतं. हरिनाम सप्ताह असतो. हे सगळं रात्रीच आपल्या गावांमध्ये असतं. लाऊडस्पीकर चालू असतो. आपण कधी कुणाला बोलत नाही. काही ठिकाणी वाघ्या-मुरळीचे कार्यक्रम चालू असतात, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
उत्तरप्रदेशातल्या निर्णयानुसार मथुरेमध्ये पहाटेचा लाऊडस्पीकर बंद करण्याचा निर्णय घेतला. जर एखादी गोष्ट सर्वांच्या संमतीने न त्रास होता होत असेल, तर नवीन प्रश्न निर्माण करण्याचं कारण काय?" असा सवाल देखील अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.