लिंक रोड, गोरेगाव स्टेशनला शरद रावांचे नाव देण्याची शरद पवारांकडे मागणी
कामगारांच्या हक्कांसाठी गोरेगाव पश्चिम येथील जलनिधी सोसायटीमधून लढ्याला सुरूवात केलेल्या शरद राव यांचे नाव लिंक रोड, गोरेगाव स्टेशनला देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे
X
मुंबई - कामगारांच्या हक्कांसाठी गोरेगाव पश्चिम येथील जलनिधी सोसायटीमधून लढ्याला सुरूवात केलेल्या शरद राव यांचे नाव लिंक रोड, गोरेगाव स्टेशनला देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
50 वर्षे कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा उभारणाऱ्या शरद राव यांचे पाच वर्षापुर्वी निधन झाले. त्यामुळे कामगारांच्या हक्कासाठी लढा उभारणाऱ्या शरद राव यांचे नाव लिंक रोड, गोरेगाव स्टेशनला देण्यात यावे, अशी विनंती प्रणाली फौंडेशनचे अनिकेत पडवळ यांनी शरद पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली.
या पत्रात म्हटले आहे की, संविधान ही भारताची गीता आहे. कारण संविधान प्रत्येक नाहरीकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत संजीवनी आहे. या संविधानाला प्रमाण मानुन कामगारांच्या हक्कांसाठी शरद राव हे 50 वर्षे लढले. ते शरद पवार यांचे मित्र होते. त्यामुळे शरद पवार यांनीही त्यांच्या अनेक लढ्याला पाटींबा दिला होता. तर शरद राव यांची जनमानसात एक वेगळीच प्रतिमा आहे.
त्यामुळे कामगारांच्या हक्कासाठी शरद राव यांनी ज्या ठिकाणी लढ्याला सुरूवात केली. तर त्यांचे अनेक राजकीय नेत्यांसोबत मतभेद होते. मात्र त्यांनी कधी मनभेद होऊ दिले नाहीत. तसेच शरद राव हे कला, क्रिडा आणि सामाजिक क्षेत्रात काम करत होते. तर शरद राव हे लोकशाही मुल्यांची आब राखत असत. त्यांनी तळागाळातल्या रंजल्या गांजलेल्यांसाठी आयुष्य झिजवले. मात्र त्यांचे कोणत्याही रस्त्याला, चौकाला नाव देण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. त्यामुळे शरद पवार यांनी लिंक रोड, गोरेगाव मेट्रो स्टेशनला नाव देण्याबाबत शिफारस करून अंमलबजावणी करावी, अशी मागणी पडवळ यांनी केली.