दैनिक लोकमतने खरंच शेतकऱ्यांच्या बातमीला प्राथमिकता दिली आहे का? ऋषी दर्डांच्या ट्वीटचं सत्य काय?
दैनिक लोकमतने खरंच शेतकऱ्यांच्या बातमीला प्राथमिकता दिली आहे का? ऋषी दर्डांच्या ट्वीटचं सत्य काय?
X
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने उडवल्याच्या आरोपाने देशभरात खळबळ उडाली आहे. सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र, मुख्य माध्यमांनी या घटनेचं वार्तांकन न केल्याचा आरोप सोशल मीडियावरून माध्यमांवरती केला जात आहे.
माध्यमांनी शेतकऱ्यांच्या ऐवजी शाहरुख खानच्या मुलाला प्राथमिकता दिल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान रविवारी 3 ऑक्टोबरला ही घटना घडली होती. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, अनेक वृत्तपत्रांनी सोमवारी या घटनेला मुख्यबातमीची जागा दिली नाही. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चालवल्याचा आरोप आहे.
शेतकऱ्यावर एका मंत्र्याचा मुलगा गाडी चालवतो. तरी माध्यमं या घटनेला जागा देत नाहीत. असं म्हणत लोक अनेक वृत्तपत्रावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. त्याच दरम्यान लोकमत वृत्तांचा फोटो टाकत भारत गणेशपुरे (parody account ) यावरून लोकमत वृत्तपत्राचा सोमवारचा अंक ट्वीट केला आहे. ट्वीट करताना भारत गणेशपुरे (parody account ) या युजरने शेतकऱ्यांनो "लोकमत " वर बहिष्कार टाका. असं आवाहन केलं आहे.
शेतकऱ्यांनो "लोकमत " वर बहिष्कार टाका
— भारत गणेशपुरे ✋ (parody account ) (@bharat_parody) October 4, 2021
सत्ता तिथं दर्डा#लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/M0Z8Z0IzIc
दुसरीकडे लोकमत समुहाचे संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी एक फोटो ट्वीट करत शेतकरी ही आमची प्राथमिकता असल्याचं ट्वीट म्हटलं आहे.
Prioritizing news is the most important aspect of a newspaper. At @MiLOKMAT we have and will always put the nation, state, and our readers first. For us, at Lokmat it's journalism first - always. #पत्रकारितापरमोधर्म #journalism #news pic.twitter.com/ey1zNszOXr
— Rishi Darda (@rishidarda) October 5, 2021
त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये शेतकऱ्याच्या बातमीला हेडलाईनला जागा दिली आहे.
आता तुम्ही म्हणाल या दोनही ट्वीटमधील सत्यता काय?
यासाठी आम्ही लोकमतचा सोमवारचा 4 ऑक्टोबरचा अंक E pepper वर सर्च केला असता, घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी लोकमतने या शेतकऱ्यांच्या वृत्ताला हेडलाईनला जागा दिली नव्हती. शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्जप्रकरणी झालेल्या अटकेची बातमी हेडलाईन ला होती. आणि हेच ट्वीट भारत गणेशपुरे (parody account ) ने केलं होतं.
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.
त्यानंतर 5 ऑक्टोबरच्या वृत्तपत्रात लोकमत ने शेतकऱ्याच्या बातमीला हेडलाईन ला जागा दिली.
यावरुन लोकमत ने शेतकऱ्याच्या बातमीला दोन दिवसानंतर मुख्य बातमीचे स्थान दिले आहे. हे यावरुन स्पष्ट होते.
मात्र, ऋषी दर्डा यांनी दोन दिवसांनंतर या बातमीला वृत्तपत्राच्या हेडलाईनला जागा देत आमची प्राथमिकता शेतकऱ्यांना असल्याचं ट्वीट केलं आहे.