Home > Max Political > गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, जयंत पाटील यांच्यासोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन व्हायरल

गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, जयंत पाटील यांच्यासोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन व्हायरल

गृहमंत्री अनिल देशमुख, राजेश टोपे, जयंत पाटील यांच्यासोबत गुन्हेगारांचे फोटोसेशन व्हायरल
X

औरंगाबाद :( मोसीन शेख) राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख,आरोग्यमंत्री राजेश टोपे,जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटोतील हे लोकं औरंगाबाद येथील आहे.

एकावर 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे. दुसऱ्यावर बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. अन्य एकावरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

अनिल देशमुख यांच्यासोबत असलेल्या फोटोतील कलीम कुरेशी औरंगाबाद शहरात याची गुटखा किंग म्हणून ओखळ आहे. मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

तर याच फोटोतील दुसरा व्यक्ती सय्यद मतीन यावर बलात्कार, यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.तसेच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.तर तिसरा व्यक्ती जफर बिल्डर हा 500 ट्रक चोरून सुटे करून विकणाऱ्या टोळीतील गुन्हेगार आहे.

सर्व राष्ट्रवादीचेच मंत्री


सोशल मीडियावर गुन्हेगारांसोबतचे फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या सर्व फोटोमध्ये फक्त राष्ट्रवादीचेच मंत्री आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून ही मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे

Updated : 2 Feb 2021 4:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top