शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत सुधार होऊ शकतो: शिवराज सिंह चौहान
शेण आणि गोमूत्राच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत सुधार होऊ शकतो: शिवराज सिंह चौहान
X
गायींसाठी स्वतंत्र मंत्री गटाची स्थापना करणाऱ्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी आता अजब दावा केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गोमूत्र आणि शेणाच्या सहाय्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारली जाऊ शकते, असं वक्तव्य केलं आहे.
भोपाळ येथील पशुवैद्यकीय संघटनेच्या महिला विंगने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवराज सिंह चौहान म्हणाले,
गायी आणि बैलाशिवाय काम होऊ शकत नाही. शासनाने अभयारण्ये व गोशाळा केल्या, मात्र जोपर्यंत समाज जोडला जाणार नाही. तोपर्यंत शासकीय गोशाळेच काम सुरु होऊ शकत नाही नाही. महिला या क्षेत्रात आल्या आहेत. तर मला वाटतं आपलं यश निश्चित आहे. शेणापासून खते, कीटकनाशके आणि गोमूत्रापासून औषध बनवली जात आहेत. मध्य प्रदेशातील स्मशानभूमीत लाकडांऐवजी शेणापासून तयार झालेल्या शेणाच्या गोवऱ्या चा वापर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोशाळे स्वयंपूर्ण होत आहेत. शेणापासून इतर गोष्टी बनवण्याच्या दिशेनेही आम्ही काम करत आहोत.
मध्य प्रदेशच्या शिवराज सिंह सरकारने राज्यात गोरक्षणासाठी स्वतंत्र खात्याची स्थापन केली आहे. यामध्ये सध्या सहा विभागांच्या मंत्र्यांचा समावेश आहे. शिवराज सिंह चौहान हे स्वत: या गटाचे अध्यक्ष आहेत.