प्रियंका चतुर्वेदी आणि संजय शिरसाट यांच्यात 'चारित्र्या'वरून वाद
X
सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार ट्विटर वॉर सुरु झाला आहे. उबाठा गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यात हा वाद सुरु आहे. शनिवारी ठाण्यात उद्धव ठाकरे गटाने उत्तर भारतीयांची बैठक आयोजित केली होती. यावेळी खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. या नंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर यांच्यावर निशाना साधला आहे.
शिरसाट म्हणाले की प्रियंका चतुर्वेदी आपल्या भाषणात म्हणाल्यात की गद्दारांना माफ केल जाणार नाही. त्या काँग्रेसला धोका देऊन शिवसेनेत आल्या होत्या आणि आम्हाला गद्दार म्हणत आहेत. यावर ते बोलत असताना म्हणाले की चंद्रकांत खैरे यांनी सांगितले होते की आदित्य ठाकरे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांची सुंदरता पाहुन त्याना राज्यसभेवर खासदार बनवले आहे. असं म्हणत शिरसाट म्हणाले की प्रियंका चतुर्वेदीनी आम्हाला गद्दार म्हणन हे मोठी मजाक आहे.
यावर आता प्रियंका चतुर्वेदी यांनी यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की "मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे. हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही, ज्याने 50 खोक्यांसाठी आपला आत्मा आणि प्रामाणिकपणा विकला असल्याचं प्रियंका चतुर्वेदी यांनी सांगितले.
त्या पुढे म्हणाल्या की संजय शिरसाट हे राजकारण आणि महिलांबद्दलच्या त्यांच्या विचारांमधील व्यापक आजाराचे एक उत्तम उदाहरण आहे, ते त्यांच्या टिप्पण्यांमधून स्वतःचे असभ्य चारित्र्य निश्चितपणे प्रदर्शित करतात, यात आश्चर्य नाही की भाजपने त्यांना त्यांच्यासोबत ठेवले आहे. असल्याचा टोला ही लगावला आहे.
यावर आता संजय शिरसाट यांनी प्रियंका चतुर्वेदी यांना ट्विटर वरुन प्रत्यूत्तर दिलं आहे
ते म्हणावलेत की "आपण कश्या दिसता किंबहुना आपल्या भाषेत सांगायचे झाले तर चरित्र्याचे धिंधवडे आपल्याच पक्ष्यातील श्रीमान खैरे यांनी उडवले असल्याचं त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले
आपण जे मला विचारत आहत ते त्यांना विचारलं असतं तर अधिक संयुक्तिक ठरलं असतं...आम्ही कुठं तुम्हाला विचारलं की तुम्हांला का. मत ?असो द्यायचं..