Home > Max Political > विशाल पाटलांवर होणार काँग्रेसकडून कारवाई ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

विशाल पाटलांवर होणार काँग्रेसकडून कारवाई ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती

विशाल पाटलांवर होणार काँग्रेसकडून कारवाई ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची माहिती
X

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर बंडखोरीप्रकरणी काँग्रेसकडून कारवाई होणार असल्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाला सुटली होती परंतु त्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे विशाल पाटील यांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. यामुळेच आता काँग्रेसकडून त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

याबाबत नाना पटोलेंनी काय दिली प्रतिक्रिया ?

यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया देत म्हणाले की, विशाल पाटील यांना फुस लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्षविरोधी निर्णयामुळे विशाल पाटील यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार आहे. याप्रकरणी आम्ही २५ तारखेला बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये त्यांच्याबाबत निर्णय होणार आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडी हे सोबतच राहणार आहे, तरी लोकांनी आता मतविभाजन करायचे नाही, असं नाना पटोले यावेळी म्हणाले.

अर्ज मागे न घेतल्यामुळे काँग्रेसकडून होणार विशाल पाटलांवर कारवाई

सांगली लोकसभा मतदारसंघात मधल्या काळात काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात उमेदवारीवरुन तिढा निर्माण झाला होता. हा तिढा सुटल्यानंतर अखेर सांगलीची जागा ही ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. पण त्यानंतर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी पक्षासोबत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर पक्षाकडून विशाल पाटलांना हा भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारी शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु त्यांनी अर्ज मागे घेतलेला नाही तर याउलट मंगळवारी हनुमान जयंतीच्या निमित्ताने विशाल पाटील यांनी औदुंबरमधील दत्त मंदिरातून प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळे काँग्रेस पक्ष विशाल पाटलांवर कारवाई करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Updated : 23 April 2024 12:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top