कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न्यायालयात जाणार?
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार असणाऱ्या सर्व नऊ हजार प्रतिनिधींची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी मनिष तिवारी यांनी केली आहे…
X
कॉंग्रेसचा एक गट राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार असणाऱ्या सर्व नऊ हजार प्रतिनिधींची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी मनिष तिवारी यांनी केली आहे…कॉंग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. कॉंग्रेस अध्यक्ष पदाची यादी सार्वजनिक करण्याची मागणी कॉंग्रेस नेते मनिष तिवारी यांनी केली आहे. ही यादी जर कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या उमेदवारास दिली नाही तर उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची भीती अर्जदारांमध्ये निर्माण होईल. कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करताना १० प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्याचं शिफारस पत्र जोडायचं असतं. मात्र, अनेक दिवसांपासून निवडणूका न झाल्यानं प्रदेश कॉंग्रेस समितीची अधिकृत यादी नाही. त्यामुळं शिफारस केलेल्या सदस्यांपैकी एखादा सदस्य प्रदेश कॉंग्रेस समितीचा सदस्य नसल्यास उमेदवाराचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळं ही यादी सार्वजनिक करण्याची मागणी कॉंग्रेस चा एक गट करत आहे. ही यादी दिली नाही तर कॉंग्रेसचा हा गट न्यायालयात जाऊ शकतो.
कधी होणार निवडणूक?
निवडणुकीची अधिसूचना - २२ सप्टेंबर
उमेदवारी अर्ज भरणे - २४ ते ३० सप्टेंबर
अर्जांची छाननी - १ ऑक्टोबर
अर्ज माघारी घेण्याची मुदत - ८ ऑक्टोबर
मतदान - १७ ऑक्टोबर
मतमोजणी - १९ ऑक्टोबर